धक्कादायक! मेहुण्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून करत होता ब्लॅकमेल, गावात डबल मर्डरने खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 09:27 AM2020-08-20T09:27:02+5:302020-08-20T09:29:12+5:30
मेहुण्याने त्याच्या मेहुण्यालाच या ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला मारण्याची सुपारी दिली. फरीदाबादच्या जसाना गावातील या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी मृत मोनिकाच्या भावाला अटक केलीय.
हरयाणाच्या फरीदाबादमध्ये ११ ऑगस्ट रोजी एक डबल मर्डर झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या चौकशीतून समोर आले की, एका व्यक्तीने त्याच्या मेहुण्याच्या पत्नीला ब्लॅकमेल केलं. तर मेहुण्याने त्याच्या मेहुण्यालाच या ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला मारण्याची सुपारी दिली. फरीदाबादच्या जसाना गावातील या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी मृत मोनिकाच्या भावाला अटक केलीय.
या हत्याकांडात मोनिका आणि तिचा पती सुखबीरी हात-पाय बांधून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. आरोपी ब्रम्हजीत फरीदाबादच्या जसाना गावात झालेल्या दाम्पत्य हत्याकांडातील मृतक मोनिकाचा भाऊ आहे. पोलिसांनुसार, ब्रम्हजीतच्या बहिणीचा पती सुखबीर हा ब्रम्हजीतच्या पत्नीला काही अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत होता. यालाच कंटाळून ब्रम्हजीतने त्याचा मेहुणा विष्णुसोबत मिळून सुखबीरची हत्या करण्याचा प्लॅन केला.
ही घटना घडली तेव्हा मोनिकाने तिच्या भावाच्या मेहुण्याला ओळखले होते. त्यामुळे मोनिकाच्या पतीची हत्या करण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी मोनिकाची सुद्धा हत्या केली. ज्याप्रकारे हे हत्याकांड केलं गेलं त्यावरून पोलिसांचा सर्वात पहिला संशय मोनिकाच्या परिवारावरच गेला. सध्या मुख्य आरोपी ब्रम्हजीतला रिमांडवर ठेवण्यात आलं आहे. विष्णु आणि त्याच्या साथीदारांना विचारपूस केल्यावर अटक करण्यात आली आहे.
११ ऑगस्ट रोजी जसाना गावात मोनिका आणि तिचा पती सुखबीर यांची हात-पाय बांधून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येत सहभागी चारही आरोपींची सीसीटीव्ह फुटेजमधून ओळख पटली होती. हे हत्याकांड करण्यासाठी ब्रम्हजीतने मेहुणा विष्णूसोबत मिळून मेरठवरून ३ शूटर बोलवले होते. हत्येत सहभागी मोनिकाच्या वहिणीचा भाऊ विष्णु आणि ३ शूटरना आधीच पोलिसांनी अटक केलीये.
हे पण वाचा :
सलमान खानच्या हत्येच्या कटाचा पर्दाफाश, शार्पशूटरचा गौप्यस्फोट
पोलीस असल्याचे सांगून ठेकेदाराने अपहरण
एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब