बहिणीच्या लग्नासाठी पैसे कमी पडले म्हणून केली चोरी, पोलिसांनी असं पकडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 10:52 AM2023-08-25T10:52:29+5:302023-08-25T10:52:48+5:30

Crime News ; गेल्या 9 जुलैला कटेयाच्या चक्रपान कौशल विकास केंद्राचं लॉक तोडून 21 लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गैजेट्सची चोरी करण्यात आली होती.

Brother made a plan of theft money in sister marriage police caught him | बहिणीच्या लग्नासाठी पैसे कमी पडले म्हणून केली चोरी, पोलिसांनी असं पकडलं...

बहिणीच्या लग्नासाठी पैसे कमी पडले म्हणून केली चोरी, पोलिसांनी असं पकडलं...

googlenewsNext

Crime News ;  बिहारच्या गोपालगंजमधून चोरीची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. गोपालगंज पोलिसांनी कौशल विकास केंद्रातून चोरी करण्यात आलेले 21 लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई हथुआ एसडीपीओ यांच्या नेतृत्वात एसआयटी द्वारे करण्यात आली. चोरांच्यां या टोळीतील चार लोकांना अटक करण्यात आली आहे.

चोरीचं अजब कारण...

एसपी यांनी सांगितलं की, गेल्या 9 जुलैला कटेयाच्या चक्रपान कौशल विकास केंद्राचं लॉक तोडून 21 लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गैजेट्सची चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी नंतर या चोरीचा खुलासा केला. एसपीने सांगितलं की, या चोरांच्या टोळीचा मुख्य रंजीत कुमार शर्मा आहे. तो कटेयाचा राहणारा आहे.

पैसे कमी पडल्याने केली चोरी

एसपीने सांगितलं की, रंजीत कुमार शर्माच्या घरी बहिणीचं लग्न होतं. लग्नासाठी काही पैसे कमी पडत होते. त्यामुळे त्याने चार मित्राना सोबत घेऊन कौशल विकास केंद्रातून 21 लॅपटॉपची चोरी केली. हा सगळा प्लान रंजीत कुमार शर्माने केला होता. 

पोलिसांनी सांगितलं की, चोरी करण्यात आलेले 21 लॅपटॉप सोबत चार्जर आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले हत्यार ताब्यात घेण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या कुणाचाही गुन्ह्याचा रेकॉर्ड आढळून आला नाही.

Web Title: Brother made a plan of theft money in sister marriage police caught him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.