भावाने 13 वर्षाच्या बहिणीला लग्नाच्या नावावर विकण्यापासून बचावलं, वाचा किती लाखात ठरली होती डील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 02:52 PM2023-02-24T14:52:49+5:302023-02-24T14:53:12+5:30

Fraud Marriage: तलेसरा गावात राहणारा पुष्पेंद्र सिंह याने तक्रारीत सांगितलं की, त्याचा शेजारी सुरेंद्र सिंह याने त्याच्या विधवा आईला फसवून त्याच्या 13 वर्षाच्या बहिणीचं लग्न ठरवलं.

Brother saved 13 year old sister from being sold in the name of marriage | भावाने 13 वर्षाच्या बहिणीला लग्नाच्या नावावर विकण्यापासून बचावलं, वाचा किती लाखात ठरली होती डील

भावाने 13 वर्षाच्या बहिणीला लग्नाच्या नावावर विकण्यापासून बचावलं, वाचा किती लाखात ठरली होती डील

googlenewsNext

Fraud Marriage: अलिगढच्या गोंडा भागात एका भावाने आपल्या 13 वर्षीय बहिणीला लग्नाच्या नावावर विकली जाण्यापासून वाचवलं. काही लोकांनी लग्नाच्या नावावर साडे तीन लाख रूपये घेतले होते आणि त्यातील एक लाख रूपये स्वत:च ठेवून घेतले. अडीच लाख रूपये मुलीच्या विधवा आईला दिले. नंतर मुलीच्या भावाने पोलिसात तक्रार दिली आणि उडान सोसायटीचे लोक तिथे पोहोचले. त्यांनी लग्न थांबवलं. यावेळी वराती लोक पळून गेले. 

तलेसरा गावात राहणारा पुष्पेंद्र सिंह याने तक्रारीत सांगितलं की, त्याचा शेजारी सुरेंद्र सिंह याने त्याच्या विधवा आईला फसवून त्याच्या 13 वर्षाच्या बहिणीचं लग्न ठरवलं. ती 9व्या वर्गात शिकत आहे. साडे तीन लाख रूपये घेऊन हे लग्न ठरवण्यात आलं. ज्यातील एक लाख लग्न ठरवणाऱ्यांनी घेतले आणि बाकीचे मुलीच्या आईला दिले. पुष्पेंद्रच्या सूचनेनंतर उडान हेल्पलाइन संस्थेचे लोक आणि पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी लग्न रोखलं. तेव्हा वराती पळून गेले.

पुष्पेंद्रने सांगितलं की, मी तलेसरा गावातील आहे. माझी बहीण अल्पवयीन आहे. तिच्या लग्नाच्या नावावर मधल्या लोकांनी एक लाख रूपये घेतले. तेच उडान सोसायटीच्या सदस्यांनी सांगितलं की, आमच्याकडे एक सूचना आली होती की, गोंडामध्ये एका अल्पवयीन मुलीचं लग्न केलं जात आहे. आम्ही इतर काही लोकांना संपर्क केला. तेव्हा पोलिसांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लग्न थांबवलं.

Web Title: Brother saved 13 year old sister from being sold in the name of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.