भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा 

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 20, 2023 05:41 PM2023-03-20T17:41:53+5:302023-03-20T17:43:19+5:30

बिहार येथील तीन जणांनी पटेल यांच्यावर पाळत ठेवून 15 मार्चला नेरुळ येथे त्यांची गाडी अडवून गोळ्या झाडून हत्या केली होती. 

Brother's murder avenged by murder The explanation of the murder of a developer in Nerul | भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा 

भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा 

googlenewsNext

नवी मुंबई - नेरुळ येथे झालेल्या विकासकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मयत विकासकाचे गुजरात येथील मूळ गावी अनेकांसोबत वाद होते. त्याच्यावर 1998 मध्ये हत्येचा गुन्हाही आहे. याच घटनेतील मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सवजीभाई मंजेरी, 56 (पटेल) यांच्या त्रासाला कंटाळून 25 लाखाला हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार बिहार येथील तीन जणांनी पटेल यांच्यावर पाळत ठेवून 15 मार्चला नेरुळ येथे त्यांची गाडी अडवून गोळ्या झाडून हत्या केली होती. 

या गुन्ह्यात पोलिसांनी चौघांना अटक केली असून मेहेक नारिया, कौशल यादव, गौरवकुमार यादव व सोनूकुमार यादव अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात इतरही अनेकांचा सहभाग असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: Brother's murder avenged by murder The explanation of the murder of a developer in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.