जुन्या वादातून एकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून; एकाला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:55 PM2021-10-11T19:55:37+5:302021-10-11T19:57:40+5:30
Crime News : या प्रकरणी आरोपी प्रल्हाद सचदेव यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
भुसावळ जि. जळगाव - जुन्या वादातून एकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याप्रकरणी प्रल्हाद होलाराम सचदेव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ येथील सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी सोमवारी हा निकाल दिला. आनंद अशोक वाघमारे (३५, रा. पंचशील नगर, भुसावळ) खून झालेल्या इसमाचे नाव आहे. आनंद वाघमारे व प्रल्हाद सचदेव यांच्यात काही कारणावरुन वाद होता. दोघांनी ६ मे २०१८ रात्री सोबत मद्यसेवन
केले. यादरम्यान या दोघांमध्ये वाद झाला आणि प्रल्हाद याने आनंदा याच्यावर चाकूने वार केले.
११ वेळेस पोट व पाठीवर भोसकण्यात आल्यामुळे आनंदचा जागीच मृत्यू झाला होता. त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. नंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी प्रल्हाद सचदेव यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.