अकोटात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:21 AM2021-04-22T11:21:45+5:302021-04-22T11:23:10+5:30

Brutal murder of a youth in Akot : अब्दुल सलमान अब्दुल राजिक (२४) याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून त्याची निर्घृण हत्या केली.

Brutal murder of a youth due to pre-enmity in Akot | अकोटात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या

अकोटात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या

Next
ठळक मुद्देअकोट शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याचे बाेलल्या जाते.

अकोट : शहरातील अकबरी प्लाॅटमध्ये पूर्व वैमनस्यातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकोट शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

शहरातील अकबरी प्लॉटमधील काही युवकांनी पूर्व वैमनस्यातून अब्दुल सलमान अब्दुल राजिक (२४) याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती अकोट शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष महल्ले यांना मिळताच, त्यांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी केली व दोघांना ताब्यात घेतले. अब्दुल सलमान याची पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या रमजान महिन्यातसुध्दा हत्येची घटना घडली होती.

कोरोनामुळे संचारबंदी असताना मारेकऱ्यांनी अकबरी प्लाॅटमध्ये अब्दुल सलमान अब्दुल राजिक याच्यावर धारदार शस्त्राने सपापसप वार केले. अब्दुल सलमान हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अब्दुल सलमान याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून अब्दुल सलमान याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. उशिरा रात्री पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू होती. अब्दुल सलमान याची हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याचे बाेलल्या जाते. परंतु त्याच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Brutal murder of a youth due to pre-enmity in Akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.