कोठडीतून पळालेला बांधकाम व्यावसायिक पुन्हा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 07:41 AM2019-11-25T07:41:29+5:302019-11-25T07:41:48+5:30

बँक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

The builder escapes from the closet again | कोठडीतून पळालेला बांधकाम व्यावसायिक पुन्हा अटकेत

कोठडीतून पळालेला बांधकाम व्यावसायिक पुन्हा अटकेत

Next

डोंबिवली : बँक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. रामनगर पोलिसांनी त्याला पुन्हा मुंबई विमानतळावरून अटक केली.

जगदीश वाघ याने २०१२-१३ मध्ये दोन सदनिका आणि एक प्लॉट सीकेपी बँकेकडे गहाण ठेवून त्या बदल्यात सात कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने बँकेतर्फे मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, वाघने कर्ज न फेडताच बँकेकडे गहाण मालमत्ता परस्पर विक्री केल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. त्यानुसार, बँकेतर्फे रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानुसार, जगदीश वाघ रामनगर पोलिसांच्या कोठडीत होता.

रविवारी सकाळी ९च्या सुमारास वाघने लघुशंका आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पोलीस त्याला पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या शौचालयाजवळ घेऊन गेले. त्यावेळी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत त्याने पोबारा केला. त्यानंतर, महाराष्ट्राबाहेर पळून जाण्यासाठी त्याने मुंबई विमानतळ गाठले. ही बाब बातमीदारांमार्फत रामनगर पोलिसांना कळताच, पोलिसांनी मुंबई विमानतळावरून वाघ याला ताब्यात घेतले. कोठडीतून पळून गेलेल्या वाघविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे
आरोपी जगदीश वाघ याला पुन्हा अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले असले, तरी पोलीस कोठडीतील आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील आरोपीबाबत पोलिसांची अशी भूमिका असेल, तर अन्य गुन्ह्यांतील आरोपींना किती सवलती दिल्या जात असतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: The builder escapes from the closet again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.