भयंकर! भाजपा आमदाराच्या आईवर चोरट्यांचा जीवघेणा हल्ला; कानातल्यांसाठी कानावर केला वार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:51 PM2022-09-14T12:51:31+5:302022-09-14T12:53:03+5:30

Crime News : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रदीप चौधरी यांच्या 80 वर्षीय आईचे कानातले चोरीला गेले आहेत.

bulandshahr bjp mla pradeep chaudhary mother looted miscreants snatch jewelry up police alert | भयंकर! भाजपा आमदाराच्या आईवर चोरट्यांचा जीवघेणा हल्ला; कानातल्यांसाठी कानावर केला वार

भयंकर! भाजपा आमदाराच्या आईवर चोरट्यांचा जीवघेणा हल्ला; कानातल्यांसाठी कानावर केला वार

Next

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक भय़ंकर घटना समोर आली आहे. भाजपा आमदाराच्या आईवर चोरांनी हल्ला केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कानातले चोरण्यासाठी त्यांनी कानावर वार केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रदीप चौधरी यांच्या 80 वर्षीय आईचे कानातले चोरीला गेले आहेत. संतोष देवी सकाळी चालायला गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला. 

बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी महिलेचे कानातले ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चोरट्यांनी कटरने संतोष देवींच्या दोन्ही कानांवर कटरने वार केला आणि कानातले काढून घेतले. कटर हल्ल्यामुळे संतोष देवी जखमी झाल्या आहेत. संतोष देवी प्रताप विहार परिसरात त्यांचा लहान मुलगा जीतपालसोबत राहतात. त्या सकाळी फिरायला गेल्या असताना ही घटना घडली.

देहली पब्लिक स्कूलजवळ दोन चोरटे दुचाकीवरून फिरत होते. संतोष देवी तिथे पोहोचताच त्यांनी कानातले चोरण्यासाठी त्यांच्यावर बंदूक रोखली. कानातले काढून द्या, असं चोरटे म्हणाले. त्यानंतर त्यांनी स्वत:चं कानातले हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश येताच त्यांनी कटरचा वापर केला. 

चोरट्यांनी कटरनं कानावर हल्ला करताच संतोष देवी यांनी ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून आसपासचे लोक जमा झाले. ते पाहून चोरट्यांनी घाबरून धूम ठोकली. आसपासच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bulandshahr bjp mla pradeep chaudhary mother looted miscreants snatch jewelry up police alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.