अश्लील Video, हनी ट्रॅप अन् ब्लॅकमेलिंग; नेते, चित्रपट निर्मात्यांना बंटी-बबली 'असे' अडकवायचे जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:02 PM2022-10-14T15:02:33+5:302022-10-14T15:04:03+5:30

Crime News : श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून हनी ट्रॅपिंग आणि ब्लॅकमेलिंग सुरू करायचे. यामध्ये नेत्यांपासून चित्रपट निर्माते बंटी-बबलीच्या रडारवर होते.

bunty bubbly who preyed upon politicians to become rich in no time ministers filmmaker among list of victims | अश्लील Video, हनी ट्रॅप अन् ब्लॅकमेलिंग; नेते, चित्रपट निर्मात्यांना बंटी-बबली 'असे' अडकवायचे जाळ्यात

फोटो - आजतक

Next

देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. ओडिशामध्ये राहणाऱ्या एका बंटी-बबलीचा पर्दाफाश झाला आहे. लवकरात लवकर जास्त पैसे कमावण्याच्या हेतूने यांनी एक शॉर्टकट निवडला. श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून हनी ट्रॅपिंग आणि ब्लॅकमेलिंग सुरू करायचे. यामध्ये नेत्यांपासून चित्रपट निर्माते बंटी-बबलीच्या रडारवर होते. एका छोटयाशा गावात राहणाऱ्या मुलीने फक्त पाच वर्षांत आलिशान घर घेतलं. तसेच ती बीएमडब्ल्यूमधून फिरू लागली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या बोलांगीरमध्ये राहणारी अर्चना 2015 मध्ये भुवनेश्वरला पोहोचली. तिने इंटिग्रेटेड लॉ कोर्ससाठी प्रवेश घेतला. सुरुवातीला एक खासगी सुरक्षा एजन्सीत काम सुरू केलं. काही महिन्यांत तिने नोकरी सोडली आणि ब्युटी पार्लर सुरू केलं. 2017 मध्ये अर्चनाची भेट बालासोर जिल्ह्यातील 33 वर्षांच्या जगबंधू चंदशी झाली. जगबंधू अतिशय महत्त्वाकांक्षी होता. तो गावात किराणा मालाचं दुकान चालवायचा. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. 

2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. यानंतर जगबंधूनं वेगळाच उद्योग सुरू केला. तो अर्चनाच्या मदतीने श्रीमंतांना हनीट्रॅप करायचा आणि ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. जगबंधू त्याच्या संभाव्य सावजांना स्वत:ची ओळख एका प्रमुख राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून करून द्यायचा. त्यामुळे श्रीमंत उद्योगपती, मंत्री, खासदार, चित्रपट निर्माते यांच्याशी त्याच्या ओळखी झाल्या. दोघे श्रीमंत व्यक्तींना आपल्या घरी बोलवायचे. त्यांना जेवणाचं निमंत्रण द्यायचे. चांगली ओळख झाल्यावर दोघे त्या व्यक्तीला जाळ्यात अडकवायचे. त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करायचे. 

बेडरुममध्ये त्यासाठी त्यांनी स्पाय कॅमेरा लावला होता. पुढे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळायचे. अर्चनाने अनेकांना आपल्या जाळ्यात फसवलं. चित्रपट निर्माता अक्षय परीजियालादेखील तिने गळाला लावण्याचा प्रयत्न केला. एका मुलीच्या माध्यमातून अर्चनाने अक्षयवर कास्टिंग काऊचचा आरोप केला. प्रकरण दाबण्यासाठी तिने तीन कोटींची मागणी केली. मात्र अक्षयने नायापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bunty bubbly who preyed upon politicians to become rich in no time ministers filmmaker among list of victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.