नागपुरात गेस्ट हाऊसमध्ये चोरी; अडीच लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 09:38 PM2020-06-29T21:38:30+5:302020-06-29T21:40:41+5:30
गेस्ट हाऊसमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी एका महिलेचे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविवारी या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेस्ट हाऊसमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी एका महिलेचे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविवारी या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रियदर्शिनी कॉलेजजवळ बृहम नागपूर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. येथे जोत्सना श्रीकांत सतदेवे राहतात. त्यांनी १४ एप्रिलला आपल्या गेस्ट हाऊसच्या लाकडी कपाटात प्लास्टिकच्या डब्यात दोन लाख ३८ हजार, ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवले होते. नंतर तिकडे जाणे झाले नाही. २१ जूनला सायंकाळी गेस्ट हाऊसमध्ये गेल्या तेव्हा त्यांनी कपाटात बघितले असता सोन्याचे दागिने असलेला डबा चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी ७ दिवस इकडेतिकडे पाहणी केली, कुटुंबातील सदस्यांना विचारणा केली. त्यानंतर सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी रविवारी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार मोहन कनोजिया यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.