विजय कॉलनीमध्ये घरफोडी; ४ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

By सागर दुबे | Published: April 7, 2023 03:32 PM2023-04-07T15:32:41+5:302023-04-07T15:33:09+5:30

याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.

Burglary in Vijay Colony; 4 lakh 30 thousand instead of lumpas | विजय कॉलनीमध्ये घरफोडी; ४ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

विजय कॉलनीमध्ये घरफोडी; ४ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

googlenewsNext

जळगाव : विजय कॉलनीतील प्रसाद अपार्टमेंटमधील रहिवासी गणेश नारायण व्यास यांच्या बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ४ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.

प्रसाद अपार्टमेंट येथे गणेश व्यास हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला असून गुरूवारी दुपारी व्यास हे कामावर होते. तर कुटूंबिय खरेदीसाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद होता. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅट फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेली.

मुलाचा कॉल आला, घराचा दरवाजा उघडा आहे...
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास व्यास यांचा मुलगा ध्रुव हा घरी आला. त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केल्यानंतर कपाट सुद्धा तुटलेले दिसले. हा प्रकार त्याने वडिलांना सांगून ताबडतोब घरी येण्यास सांगितले. व्यास हे घरी आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेले तर आतील खोलीतील कपाट, कपाटातील ड्रॉव्हर तुटलेले व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे डबे बेडवर अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी लागलीच त्यांच्या पत्नीला घरी बोलवून घेतले. त्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. रात्री व्यास यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

असा आहे चोरीला गेलेला मुद्देमाल
१ लाख ८० हजार रूपयांची रोकडसह ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगळपोत, ८० हजार रूपयांची सोन्याची चेन, ६० हजार रूपये किंमतीचे कानातील पैंडल, ८ हजार रूपये किंमतीची सोन्याची फुली, १२ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ, २ हजार रूपये किंमतीची चांदीची साखळी, ८ हजार रूपये किंमतीचे चांदीचे शिक्के असा एकूण ४ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
 

Web Title: Burglary in Vijay Colony; 4 lakh 30 thousand instead of lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.