मांगूळ झनक येथे घरफोडी; दागिण्यांसह ८२ हजाराचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:56 PM2018-10-03T15:56:34+5:302018-10-03T15:57:09+5:30
शिरपूर (वाशिम) - घरात कुणी नसल्याची संधी साधून मांगूळ झनक येथे घरफोडी करीत अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिण्यांसह ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३ आॅक्टोबरला सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर (वाशिम) - घरात कुणी नसल्याची संधी साधून मांगूळ झनक येथे घरफोडी करीत अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिण्यांसह ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३ आॅक्टोबरला सकाळी उघडकीस आली.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगूळ झनक ता. रिसोड येथील सुमन सुरेश झीनजान ही महिला २ आॅक्टोबरला सकाळी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी, कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाट उघडून २० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोथ, २० हजार किंमतीची सोन्याची एकदानी, २० हजार रुपये किंमतीचे कानातील झुमके, दहा हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, रोख १२ हजार रुपये असा एकूण ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सुमन झीनयान यांच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवी कलम ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राज पंडीत करीत आहेत.
बॉक्स
चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत
अलिकडच्या काळात चोरी, घरफोडीच्या घटना घडत असल्यामुळे शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया गावातील नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.