Bus Accident: सुसाट निघालेली बस वळणावरून थेट ६० फूट खाली कोसळली; तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 11:47 IST2022-05-09T11:46:37+5:302022-05-09T11:47:02+5:30
माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळ्यापासून ६ कि.मी. अंतरावरील घोणसे घाटातील वळणावर हा अपघात झाला.

Bus Accident: सुसाट निघालेली बस वळणावरून थेट ६० फूट खाली कोसळली; तिघांचा मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा (जि. रायगड) : विरार-नालासोपारा येथून श्रीवर्धन बोर्लीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसला रविवारी सकाळी घोणसे घाटातील तीव्र वळणावर भीषण अपघात झाला. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे; तर ३४ प्रवासी जखमी आहेत. जखमींमधील १५ प्रवासी गंभीर असून त्यांना उपचारासाठी माणगाव, अलिबाग आणि महाड येथे हलविण्यात आल्याची माहिती डॉ. सुशांत गायकवाड यांनी दिली आहे.
माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळ्यापासून ६ कि.मी. अंतरावरील घोणसे घाटातील वळणावर हा अपघात झाला. बस अंदाजे ६० फुटांवरून खाली कोसळली. यात श्रीवर्धन तालुक्यातील अश्विनी बिरवाडकर (३५, रा. धनगर मलई), मधुकर बिरवाडकर (६०, रा. धनगर मलई), सुशांत रिकामे (२८, रा. वडघर पांगलोली) यांचा मृत्यू झाला.