व्यावसायिक वादातून शेजाऱ्याचा दरवाजा पेटविला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 07:35 AM2019-02-03T07:35:43+5:302019-02-03T07:35:59+5:30

व्यावसायिक वादातून शेजा-याच्या कुटुंबाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार दहिसरमध्ये घडला. स्थानिक आणि पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत या कुटुंबाला वाचविल्याने जीवितहानी टळली.

 A business dispute turns into a neighbor's door | व्यावसायिक वादातून शेजाऱ्याचा दरवाजा पेटविला

व्यावसायिक वादातून शेजाऱ्याचा दरवाजा पेटविला

Next

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई : व्यावसायिक वादातून शेजा-याच्या कुटुंबाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार दहिसरमध्ये घडला. स्थानिक आणि पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत या कुटुंबाला वाचविल्याने जीवितहानी टळली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
चंदु सरवय्या आणि संजय सरवय्या अशी अटक दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार राजेश भुवालप्रताप गुप्ता (४३) हे हिरा कारागीर आहेत़ ते दहिसर पूर्वच्या रावळपाड्यातील श्यामनारायण दुबे चाळीत पत्नी मीरादेवी (४०) आणि दोन मुले धनंजय (१६), अनुज (१५) यांच्यासह राहतात. मीरादेवी या साडीला फॉल बिडिंग करण्याचे काम करतात. त्यासाठी नुकतीच त्यांनी शिलाई मशीनही खरेदी केली. तर चंदू याची पत्नी प्रफुला (४५) देखील हेच काम करते. मात्र मीरादेवीकडे मशीन असल्याने त्यांचे काम अधिक वेगाने होऊ लागले. त्यांची शिलाईदेखील कमी असल्याने ग्राहक त्यांच्याकडे जाऊ लागले. याचा फटका सरवय्या कुटुंबाला बसला. त्यावरून त्यांचे गुप्ता कुटुंबासोबत वादही होऊ लागले. अखेर राजेश यांनी पत्नी मीरादेवी यांना सरवय्या कुटुंबाशी संभाषण बंद करण्यास सांगितले.
दरम्यान, २६ जानेवारीला फॉल बिडिंगच्या शिलाईवरून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. तेव्हा सरवय्या याने गुप्ता कुटुंबाला धमकी दिली. त्यानंतर २७ जानेवारीला गुप्ता कुटुंबीय झोपले असताना त्यांच्या दरवाजावर कोणीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून तो पेटवून दिला. मीरादेवी यांना जाग आली आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकल्याने राजेश तसेच त्यांची दोन मुलेही जागी होऊन मदत मागू लागली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मिळालेल्या माहितीनुसार दहिसर पोलिसांचे एक पथकही तेथे दाखल झाले आणि दरवाजा तोडून गुप्ता कुटुंबाला बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. गुप्ता कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी चंदू आणि त्याचा नातेवाईक संजय यांच्या मुसक्या आवळल्या.

Web Title:  A business dispute turns into a neighbor's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.