बोगस जामीनदारांद्वारे कोर्टाच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 06:20 PM2018-12-20T18:20:48+5:302018-12-20T18:22:13+5:30

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून या टोळीने चक्क पोलीस ठाण्यापासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्याच खोट्या सह्या व रबरी शिक्के गुन्ह्यात वापरल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणामागे अन्य काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे.

Busted group busted by the bogus defendants in the court's eyes | बोगस जामीनदारांद्वारे कोर्टाच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

बोगस जामीनदारांद्वारे कोर्टाच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

ठळक मुद्देटोळीने चक्क पोलीस ठाण्यापासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्याच खोट्या सह्या व रबरी शिक्के गुन्ह्यात वापरल्याचे तपासात पुढे आले या प्रकरणामागे अन्य काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2013 साली डी.टी.एस कंपनीतील गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजय ओमप्रकाश शर्मा याला अटक केली होती

मुंबई - आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 1 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून या टोळीने चक्क पोलीस ठाण्यापासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्याच खोट्या सह्या व रबरी शिक्के गुन्ह्यात वापरल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणामागे अन्य काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2013 साली डी.टी.एस कंपनीतील गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजय ओमप्रकाश शर्मा याला अटक केली होती. संजयने कंपनीला बोगस बिले आणि कामगारांची बनावट पगाराची स्लिप दाखवून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. त्यानुसार कंपनीने गुन्हा नोंदवल्यानंतर त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. संजयच्या अटकेनंतर त्याने न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.  संजयला जामीन मिळावा यासाठी उस्मान गणी उमर शेख, इम्रान मुबारक अली शेख, रशीद बब्बे हुसेन शेख खान, मोहम्मद मन्सुर आलम, मोहम्मद शमशाद नूर रझा यांना जामीनदार म्हणून उभे केले. मात्र, या पाचही जामीनदारांची कागदपञ पडताळणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी बनावट कागदपत्र आणि शिक्याचा वापर करुन ही कागदपत्रे बनवून न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत पुढे आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात जामीन राहिलेल्या उस्मान गणी उमर शेख, इम्रान मुबारक अली शेख, रशीद बब्बे हुसेन शेख खान, मोहम्मद मन्सुर आलम, मोहम्मद शमशाद नूर रझा यांच्यावर गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता हा गुन्हा कालांतराने गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासात जामीन राहिलेल्या आरोपींनी स्वत:ची मूळ माहिती लपवून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, कंपनीचे ओळखपत्र आणि संबधित कागदपत्रांवर स्थानिक पोलीस ठाणे व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बनावट सही केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या गुन्ह्यात  उस्मान गणी उमर शेख आणि मोहम्मद शमशाद नूर रझा याला अटक केली होती. तर दोनच दिवसांपूर्वी इम्रान मुबारक अली शेख याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. इम्रानच्या चौकशीतून पोलिसांनी फरार आरोपी रशीद बब्बे हुसेन खान (55), मोहम्मद मन्सूर आलम अब्दुल  वाहिद अन्सारी (43) याला अटक केली. ही टोळी स्वत:ची माहिती लपवून अशा प्रकारे आरोपींना बोगस जामीनादार राहून सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Busted group busted by the bogus defendants in the court's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.