'जिलेट'चे बनावट उत्पादन बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 08:50 PM2018-10-23T20:50:41+5:302018-10-23T21:01:59+5:30
याप्रकरणी पंकज निसर (वय ३७), पंकज जैन (वय ३८), मांगीलाल चौधरी (वय ३७), बदर शेख (वय २३), इफ्तेखार आलम (वय २२), तबरेज शेख (वय २१), मोहम्मद आरिफ पीर मोहम्मद शेख (वय ४४) आणि प्रवीण गोविंद फुलावला (वय ६२) अशी या रॅकेटमधील नऊ आरोपींची नावे आहेत.
मुंबई - प्रॉक्टर अँड गॅम्बल या बहुराष्ट्रीय कंपनीच्या जिलेट या उत्पादनाची हुबेहूब नक्कल बनवून मुंबई आणि लगतच्या परिसरातील बाजारपेठांत बनावट उत्पादन विकणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या विविध पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पंकज निसर (वय ३७), पंकज जैन (वय ३८), मांगीलाल चौधरी (वय ३७), बदर शेख (वय २३), इफ्तेखार आलम (वय २२), तबरेज शेख (वय २१), मोहम्मद आरिफ पीर मोहम्मद शेख (वय ४४) आणि प्रवीण गोविंद फुलवाला (वय ६२) अशी या रॅकेटमधील नऊ आरोपींची नावे आहेत.
प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीचे कायदेशीर सल्लागार यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या विविध पथकांनी क्रॉफर्ड मार्केट आणि अंधेरी येथील सुपर शॉपिंग सेंटर या ठिकाणी १० दुकानांवर छापे टाकून नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून बनावट माळ जप्त करण्यात आला आहे.