बनावट गुणपत्रिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पास करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 04:19 PM2018-10-17T16:19:39+5:302018-10-17T16:20:24+5:30
त्यावेळी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन हे तिघे गुणपत्रिका काढताना आढळून आले. न्यायालयाने तिन्ही अारोपींना १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस. याप्रकरणी इतरही आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या अनुषंगाने अधिक तपास करत आहेत.
मुंबई - मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराचं अजून एक प्रकरण आता उघडकीस आलं आहे. मुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पास करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन या विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली अाहे. मुंबई विद्यापीठ कलिना येथील गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार उघडकिस आला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती बीकेसी पोलिसांनी दिली.
मुंबई विद्यापीठात पेपर घोटाळ्यानंतर आता बनावट गुणपत्रिकांचे प्रकरण उघडकीस आल्याने विद्यापीठाचा भोंगळ कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबई विद्यापिठाच्याअंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट मास्टर ऑफ सबस्टॅन्शिअल डेव्हलपमेंट या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत फेरफार करून बनवट गुुुुणपत्रिकेद्वारे विद्यार्थ्यांना उतीर्ण केले जात होते. याबाबत विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुणपत्रिका ठेवलेल्या ठिकाणचे सीसीटिव्ही तपासले. त्यावेळी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन हे तिघे गुणपत्रिका काढताना आढळून आले. न्यायालयाने तिन्ही अारोपींना १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस. याप्रकरणी इतरही आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या अनुषंगाने अधिक तपास करत आहेत.