CAA : दर्यागंज हिंसाचार प्रकरणातील १५ आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 06:43 PM2019-12-23T18:43:53+5:302019-12-23T18:46:07+5:30
दर्यागंज भागातील हिंसाचारामध्ये 49 जण जखमी झाले होते.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (CAA) देशभरात आंदोलने सुरू आहेत. शुक्रवारी २० डिसेंबरला राजधानी दिल्लीमधील हिंसाचारप्रकरणी काही नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनीअटक केले आहे.'भीम आर्मी'चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दर्यागंज भागात झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनीअटक केली होती. परवानगी नसताना आझाद यांच्या संघटनेने जामा मशीद ते जंतरमंतर दरम्यान मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेले होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देत आझाद मशिदीमध्ये शिरले होते. त्यानंतर शनिवारी २१ डिसेंबरला सकाळी मशिदीबाहेर येताच त्यांना अटक करण्यात आली होती. त्याआधी पोलिसांवर हल्ला करून हिंसाचार भडकविणाऱ्या १५ जणांना अटक करण्यात आली होती. महानगर दंडाधिकारी कपिल कुमार यांनी १५ जणांचा जामीन अर्ज फेटाळला असून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.
#UPDATE: A Delhi court dismisses bail plea of 15 accused detained in Daryaganj violence case. https://t.co/J79I22srjy
— ANI (@ANI) December 23, 2019
#UPDATE Delhi court dismisses bail plea filed by 15 accused in Daryaganj violence case. Metropolitan magistrate Kapil Kumar Sent all 15 accused to 14 days judicial custody.
— ANI (@ANI) December 23, 2019
निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आणि पोलिसांना गुंगारा दिल्याबद्दल आझाद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, लोकांना भडकावणे आणि दंगल घडवून आणणे यांसारख्या वेगवेगळ्या कलमांतर्गत आझाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील तीस हजारी कोर्टासमोर आझाद यांना सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. दर्यागंज परिसरात हिंसाचार प्रकरणी यापूर्वी 15 आंदोलकांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलीस घटनास्थळाच्या आसपास असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने दंगल भडकावणाऱ्यांचा शोध घेत आहेत. तसेच यामध्ये सामील असलेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दर्यागंज भागातील हिंसाचारामध्ये 49 जण जखमी झाले होते. यामध्ये 13 पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर एकाचा पाय मोडला आहे. तीन गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नवी दिल्ली - दर्यागंज हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्या 15 आरोपींचा जामीन दिल्लीच्या कोर्टाने फेटाळला https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) December 23, 2019