कॅब ड्रायव्हर भावोजीला अर्पिता मुखर्जीने पार्टनर म्हणून सांगितले, तीन कंपन्यांमध्ये डायरेक्टर केले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 09:53 PM2022-08-03T21:53:23+5:302022-08-03T21:54:13+5:30
Arpita Mukharjee :पण खऱ्या आयुष्यात तो कॅब ड्रायव्हर आहे. इतकंच नाही तर नात्यात तो अर्पिताचा भावोजी असल्याचं समजतं.
शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीने तिच्याशी संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक कशी केली याचा मोठा पुरावा आज तकला मिळाला आहे. अर्पिता मुखर्जीचा असाच एक व्यावसायिक भागीदार सापडला आहे, जो अर्पितासोबत तीन फर्ममध्ये संचालक होता. पण खऱ्या आयुष्यात तो कॅब ड्रायव्हर आहे. इतकंच नाही तर नात्यात तो अर्पिताचा भावोजी असल्याचं समजतं.
कल्याण धर असे या व्यक्तीचे नाव आहे. अर्पितासोबत कल्याण तीन कंपन्यांमध्ये संचालक होता. कागदावर करोडोंचा व्यवसाय करणाऱ्या या कंपन्या होत्या. शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीला अटक झाल्यानंतर या कंपन्यांची नावे समोर आली होती. याचे कल्याण सहसंचालक होते. आज तकने अर्पिताच्या या संशयित सहसंचालकाची माहिती गोळा केली आहे. तो कागदावर करोडपती आहे, पण प्रत्यक्षात तो एक कॅब ड्रायव्हर आहे. ज्याच्याकडे मोटारसायकलही नाही.
अर्पिता आणि कल्याण या तीन फर्ममध्ये संचालक आहेत. यातील पहिले सिम्बायोसिस म्हणजे मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड. अर्पिता 21 मार्च 2011 रोजी त्याची संचालक बनली. कागदपत्रांनुसार, ही कंपनी विविध प्रकारच्या वस्तूंचा घाऊक व्यापार करते. कल्याण धर याला 1 जुलै 2021 रोजी या कंपनीत सहसंचालक बनवण्यात आले.
सेन्ट्री इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असे दुसऱ्या फर्मचे नाव आहे. अर्पिता 9 नोव्हेंबर 2011 रोजी त्याची संचालक झाली. त्यानंतर 2018 मध्ये कल्याणला त्याचे संचालक केले गेले. आतापर्यंत हे दोघेही कंपनीत संचालक आहेत. कागदपत्रांनुसार ही कंपनी खास प्रकारची मशिनरी बनवते.
तिसरी फर्म इच्छा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहे. अर्पिता 29 ऑक्टोबर 2014 रोजी त्याची संचालक बनली. कल्याण धर हे या कंपनीचे दुसरे संचालक आहेत.