बहाणा करून पत्नीच्या प्रियकराला घरी बोलावले; जेवण दिले, झोपण्यास सांगितले अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 03:37 PM2023-05-27T15:37:32+5:302023-05-27T15:37:49+5:30

पत्नी-प्रियकराचे संबंध पाहून वैतागलेल्या पतीने प्रदीपच्या हत्येचा प्लॅन बनवला

called the wife's lover home under pretense; Gave food, asked to sleep after killed him | बहाणा करून पत्नीच्या प्रियकराला घरी बोलावले; जेवण दिले, झोपण्यास सांगितले अन्..

बहाणा करून पत्नीच्या प्रियकराला घरी बोलावले; जेवण दिले, झोपण्यास सांगितले अन्..

googlenewsNext

नवी दिल्ली - विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे एकाला महागात पडले आहे. या व्यक्तीला जीव देऊन प्रेमाची किंमत मोजावी लागली आहे. महिलेचा पती सातत्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या संबंधावर आक्षेप घेत होता. परंतु तरीही हा खेळ थांबला नाही म्हणून महिलेच्या पतीने संधी मिळताच पत्नीच्या प्रियकराला घरी बोलावले, जेवण दिले, रात्री झोपायला सांगितले अन् सकाळी त्याच्या पोटात चाकू भोसकून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर संजय गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंडका येथे कॉलनीत राहणाऱ्या महिलेची प्रदीप नावाच्या युवकाशी मैत्री झाली. पूजा आणि प्रदीप दोघेही एकाच फॅक्टरीत काम करत होते. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पूजाच्या अफेअरबाबत पतीला कळाले. प्रियकर प्रदीप कधी कधी पूजाच्या घरी यायचा ही बाब पतीला खटकली त्याने अनेकदा दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांनीही संबंध तोडण्यास नकार दिला. 

हत्येचा प्लॅन बनवला अन्...
पत्नी-प्रियकराचे संबंध पाहून वैतागलेल्या पतीने प्रदीपच्या हत्येचा प्लॅन बनवला. गुरुवारी पती गावी जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला, जेव्हा तो रात्री अचानक घरी आला तेव्हा प्रदीप त्याच्या घरीच असल्याचे समजले. पतीला पाहून प्रदीप तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पतीने पत्नीच्या प्रियकराला पकडले. पतीने प्रियकराला गोड बोलून घरीच जेवण्यासाठी थांबवले. त्यानंतर सकाळी प्रदीप झोपलेला असताना त्याच्या पोटात चाकू भोसकले. चाकू हल्ला झाल्यानंतर प्रदीप ओरडू लागला तेव्हा पूजा आवाज ऐकून धावत आली. त्याने हल्ल्यातून प्रदीपला वाचवण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी आरोपीला केली अटक
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रदीपला पूजाने नजीकच्या संजय गांधी रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु उपचारावेळी प्रदीपचा मृत्यू झाला. चाकू हल्ल्यात रक्त जास्त सांडल्याने प्रदीपची प्रकृती चिंताजनक झाली होती. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पती चरण सिंहला अटक केली आहे. 
 

Web Title: called the wife's lover home under pretense; Gave food, asked to sleep after killed him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.