तुझ्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, Love You Princess...; सुकेशचं जॅकलिनला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 07:53 AM2023-03-07T07:53:40+5:302023-03-07T09:39:57+5:30

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे.

Can go to any level for you, Love You Princes...; Sukesh Chandrasekhar letter to Jacqueline Fernandez | तुझ्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, Love You Princess...; सुकेशचं जॅकलिनला पत्र

तुझ्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, Love You Princess...; सुकेशचं जॅकलिनला पत्र

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या महाठग सुकेश चंद्रशेखरचे नवे पत्र माध्यमांसमोर आले आहे. होळीच्या मुहूर्तावर सुकेशने हे पत्र अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला लिहिले आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनला हॅप्पी होळी शुभेच्छा देत त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. सुकेशने जॅकलिनला सर्वोत्तम व्यक्ती म्हणत तो तिच्या आयुष्यातून गेलेले रंग परत आणेल असा विश्वास दिला आहे. 

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशने अभिनेत्री जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर १० कोटी रुपये खर्च केले. तो चार वेळा जॅकलिनला चेन्नईत भेटला आणि चार्टर्ड प्लेनवर ८ कोटी रुपये खर्च केले. होळीच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखरने लिहिले आहे की, "मी माझ्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा देतो. रंगांच्या या सणावर, मी तुला वचन देतो की तुझे रंग फिके पडले असतील किंवा गायब झाले, मी ते तुला १०० पटीने परत करीन ही माझी जबाबदारी आहे असं त्याने म्हटलं. 

तसेच 'तुला माहित आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईन, मी तुझ्यावर प्रेम करतो, हसत राहा.' तू माझ्यासाठी काय आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. लव्ह यू प्रिसेंस असं या पत्रात जॅकलिनला उद्देशून सुकेशने लिहिले, त्याचसोबत सुकेशने त्याचे कुटुंबीय, समर्थक, मित्र आणि तिरस्कार करणाऱ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण...
अलीकडेच सुकेशने आणखी एक पत्र लिहित नोराला मी जॅकलीनला सोडावे असं वाटत होतं. माझ्या नकारानंतरही नोरा मला त्रास देत आहे असा दावा सुकेशने केला होता. सुकेशने पत्रात पुढे म्हटलं होतं की, जॅकलिन आणि मी गंभीर नात्यात होतो. यामुळेच नोराला जॅकलिनचा हेवा वाटू लागला होता. जॅकलिनबाबत मला भडकवायची आणि माझं ब्रेनवॉश करत होती. नोराची इच्छा होती की मी जॅकलिनला सोडावं. मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला लागावे असी नोराची इच्छा होती. नोराने मला दिवसातून किमान १० वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर ती कॉल करत राहण्यासाठी माझ्यावर दबाव आणत असे असं त्याने सांगितले.

Web Title: Can go to any level for you, Love You Princes...; Sukesh Chandrasekhar letter to Jacqueline Fernandez

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.