ऊसतोड मजूर पुरविलेच नाही; पाच लाखांची फसवणूक, मुकादमाला शोधण्यासाठी पोलिसांची पथके!
By रवींद्र देशमुख | Published: December 24, 2023 06:32 PM2023-12-24T18:32:39+5:302023-12-24T18:32:54+5:30
फसवणूक करणार्या मुकादमाला शोधण्यासाठी सोलापूर ग्रामीण पेालिसांची दोन पथके जळगाव जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर : ऊसतोड मजूर न पुरविता पाच लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोमनाथ रत्नाकर निर्धार (वय ३८, रा. मिटकलवाडी, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सलीम पणा पावरा (वय २८, रा. आंबा पाणी, ता. यावल, जि. जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक करणार्या मुकादमाला शोधण्यासाठी सोलापूर ग्रामीण पेालिसांची दोन पथके जळगाव जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिटकलवाडी (ता. माढा) याच्या शेतात सलीम पावरा याने फिर्यादी यांच्याशी ऊसतोड मजूर पुरवठा करण्यासाठी लेखी करार केला. यावेळी फिर्यादीकडून ६ लाख रुपये घेऊन त्यांना सन २०२२-२३ सिझन चालू झाल्यापासून ४ कोयते म्हणजे ८ ऊस मजूर यांनी १ लाख रुपयाचे एका महिन्यात काम केले; परंतु ठरले व्यवहाराप्रमाणे कोयते म्हणून ऊसतोड मजूर पुरविले नाहीत.
मजुरीसाठी आलेले ४ कोयते म्हणजे ८ ऊसतोड मजूर हे फिर्यादीस न सांगता गेले व ५ लाख रुपयेही अद्यापपर्यंत परत केले नाहीत म्हणून फिर्यादीचा विश्वासघात करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी अकराच्या सुमारास टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेंबळे बीटचे पोलिस नाईक शेख हे करीत आहेत.
मुकादम पैसे घेतात अन्
सध्या साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. या हंगामात ऊसतोड मजूर पुरवठा करतो म्हणून अनेक मुकादमांनी साखर कारखान्यांच्या शेतकी विभागास ऊसतोड मजूर पुरवठा करतो म्हणून पैसे घेतले अन् मजुरांचा पुरवठा न करता आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबतच्या घटना जिल्ह्यात जास्त प्रमाणात घडत असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसून येत आहे.