पोलीस आयुक्तालयाचा पोलीस कर्मचारीच निघाला गांजाचा तस्कर; 6 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 10:57 PM2022-02-11T22:57:29+5:302022-02-11T22:57:39+5:30

गांजाची तस्करी करताना पोलीस कर्मचाऱ्यासह छत्तीसगढ पोलिसांनी ६ जणांना केली अटक. ओडिसा मधून मोठ्या प्रमाणात मुंबई , ठाणे , पालघर सह अनेक भागात गांजा ह्या अमली पदार्थांची तस्करी छत्तीसगढ मार्गे केली जाते .

Cannabis smuggler was Police of Vasai Virar Commissionerate; 6 arrested in Chattisgadh | पोलीस आयुक्तालयाचा पोलीस कर्मचारीच निघाला गांजाचा तस्कर; 6 जणांना अटक

पोलीस आयुक्तालयाचा पोलीस कर्मचारीच निघाला गांजाचा तस्कर; 6 जणांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी साजिद फारूक पठाण (३२) मूळ रा. नांदेड हाच गांजा ह्या अमली पदार्थांचा तस्कर निघाला आहे . छत्तीसगढ पोलिसांनी  ओडिसा सीमेवर पठाण सह वसई - नालासोपारा भागातील ६ जणांना अटक करून १५० किलो गांजा जप्त केला आहे . करताना पकडले आहे . 

ओडिसा मधून मोठ्या प्रमाणात मुंबई , ठाणे , पालघर सह अनेक भागात गांजा ह्या अमली पदार्थांची तस्करी छत्तीसगढ मार्गे केली जाते . बस्तर जिल्ह्यातील नगरनार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुधराम नाग ह्यांना माहिती मिळाली कि , ओडिसा मधून गांजा घेऊन मुंबईच्या दिशेने काही तस्कर जाणार आहेत . त्या अनुषंगाने त्यांनी सीमेवर धनपुंजी फॉरेस्ट नाका येथे ४ फेब्रुवारी रोजी बुधराम नाग व पोलीस पथकाने संशयित इनोव्हा गाडी अडवली . तपासणीत १६ गोणीत भरून असलेला गांजा ह्या अमली पदार्थाचा साठा सापडला . ओडिसा मधून आणलेला गांजा पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात  नेला जात होता . 

गांजा तस्करी करणारा साजिद पठाण हा पोलीस असल्याचे समजल्यावर ते सुद्धा अवाक झाले . साजिद सोबत असलेले अन्य गांजा तस्कर अजय अंगद पटेल ( २२)  रा .  कुणाल नगर , गावराई पाडा , वालिव ;  सूरज रमेश मौर्य (२२) रा . गावराई पाडा , वालीव व रितेश राजेश सिंह ( २२) रा . बिलालपाडा , नालासोपारा सर्व वसई तालुका , जिल्हा पालघर ह्यांना अटक करण्यात आली . त्यांच्या कडून ४ लाखांचा गांजा , ८ लाखांची गाडी  , मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे . हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून ओडिसा येथून ज्याच्या माध्यमातून गांजा घेतला होता त्या आरोपीसह मुख्यसूत्रधाराचा तेथील पोलीस शोध घेत आहेत . 

नगरनार पोलिसांनी त्याच दिवशी दुसऱ्या गुन्ह्यात नालासोपारा व वालिव येथे राहणाऱ्या आणखी दोघा गांजा तस्करांना सुद्धा अटक केली आहे . चांदपाशा उस्मान शेख (२३) रा. गरीब नवाज चौक , वसई व अंकित नेमचंद जयस्वाल (२१) रा. गावराई पाडा , वालीव हे दोघे एका गाडीतून ७० किलो गांजा घेऊन येत असताना त्यांना सुद्धा पकडण्यात आले . गांजा , वाहन , मोबाईल आसा ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे . 

ह्या घटनेने मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस दलात खळबळ उडाली असून साजिद हा मुख्यालयातील कर्मचारी असला तरी खानिवडा येथे चेकपोस्ट वर तैनात होता . त्याच्यावर कारवाई केली जाणार असून एका पोलीस अधिकाऱ्यास नगरनार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी रवाना केले गेले आहे . तर वसई - विरार सह मीरा भाईंदर व परिसरात गांजा आणणारे हे तस्कर नालासोपारा - वसई भागातील असल्याचे समोर आले आहे . 

बुधराम नाग ( पोलीस निरीक्षक , छत्तीसगढ पोलीस ) - दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात ६ गांजा तस्करांना १५० किलो गांजा सह पकडले आहे . ओडिसा येथून गांजा घेऊन ते पालघर जिल्ह्यात परत जात होते . पठाण हा पोलीस कर्मचारी असून तेथील पोलीस अधिकाऱ्याने आपल्याशी संपर्क केला आहे व ते येथे येणार आहेत . सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत . मुख्य सूत्रधार व मध्यस्थ यांचा शोध सुरु आहे . 

Web Title: Cannabis smuggler was Police of Vasai Virar Commissionerate; 6 arrested in Chattisgadh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस