विजयवाडा - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ११२१.५ किलो गांजा जप्त; ३ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:06 IST2019-04-19T15:04:18+5:302019-04-19T15:06:06+5:30
तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

विजयवाडा - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ११२१.५ किलो गांजा जप्त; ३ जण अटकेत
तेलंगणा - भुवानगिरी जिल्ह्यातील पंथांगी टॉल प्लाझा येथून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) काल ११२१.५ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयचे अधिकारी यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार विजयवाडा - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरीळ पंथांगी टॉल प्लाझा येथे सापळा रचून ट्रक पकडण्यात आला. ट्रकची झाडाझडती करत असताना विटांच्या खाली अमली पदार्थ असल्याचे आढळून आलं. गांजासहित ट्रक नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबटन्स (एडीपीएस) अधिनियम १९८५ अन्वये कारवाईकरिता जप्त करण्यात आला. या ट्रकमध्ये अंदाजे १. ६ कोटींचा गांजा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच सिलेरू ट्रकमधून हा गांजा महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये नेला जात असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
Hyderabad: Directorate of Revenue Intelligence (DRI) seized 1121 kg of Cannabis yesterday. #Telanganapic.twitter.com/jOZCiCdo5b
— ANI (@ANI) April 19, 2019