कार उडवली अन् पोलिसांचा युनिफॉर्म फाडला; रेंज रोव्हर गर्लचा हाय व्होल्टेज ड्रामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 11:50 AM2022-05-23T11:50:37+5:302022-05-23T13:32:15+5:30

Drunken girl range rover car road accident : एक महिला आणि दोन मुले जखमी आहेत. रेंज रोव्हर चालवणारी तरुणी दारूच्या नशेत होती, असा आरोप आहे.

Car blown up, police uniform torn; Range Rover Girl's high voltage drama | कार उडवली अन् पोलिसांचा युनिफॉर्म फाडला; रेंज रोव्हर गर्लचा हाय व्होल्टेज ड्रामा

कार उडवली अन् पोलिसांचा युनिफॉर्म फाडला; रेंज रोव्हर गर्लचा हाय व्होल्टेज ड्रामा

googlenewsNext

हरियाणातील अंबाला येथे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका मुलीने रेंज रोव्हर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लाल रंगाच्या कारला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. एक महिला आणि दोन मुले जखमी आहेत. रेंज रोव्हर चालवणारी तरुणी दारूच्या नशेत होती, असा आरोप आहे. परंतु जेव्हा तिला वैद्यकीय चाचणी घेण्यास सांगितले. तेव्हा तिने वडिलांच्या येण्यापूर्वी कोणतीही चाचणी करण्यास नकार दिला आणि गोंधळ घातला.
 


दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव रेंज रोव्हरने एका कारला मागून इतकी जोरदार धडक दिली की, कारचा स्फोट झाला. कारमधील कुटुंब प्रमुख असलेल्या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले.

नशेत होत्या मुली 
रेंज रोव्हरमधील मुली दारूच्या नशेत होत्या, त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या लोकांनी मुलींच्या गाडीला घेराव घातला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर मुलींनी महिला पोलिसांना मारहाण केली आणि त्यांच्या युनिफॉर्मवरील नेम प्लेटही उखडून टाकल्या. सध्या पोलिसांनी मुलींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

महामार्गावर प्रचंड गोंधळ
पोलीस कर्मचारी मनजीत कौर यांनी सांगितले की, अपघातानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलींनी महामार्गावरच एकच गोंधळ घातला. कसेबसे मुलींना रेंज रोव्हरमधून उतरवून पोलीस जिप्सीत बसवले, मात्र दारूच्या नशेत असलेल्या या मुलींनी वाटेत महिला पोलिसांनाही मारहाण केली.

पोलिसांना फटकारले
आरोपी मुलींनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आणि वकिलासह त्यांचे पालक येईपर्यंत पोलिसांना स्वत:ची कोणतीही माहिती न देण्यावर ठाम राहिल्या. महिला पोलिसांच्या मदतीने या दोन मुलींना अंबाला कॅन्टोन्मेंट येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, तेथेही त्यांनी हायव्होल्टेज ड्रामा केला. 

तिचा चेहरा लपवला
यानंतर पोलीस ठाण्यात बसूनही त्यांची वागणुकीत फरक पडला नाही. त्यामुळे मीडियाचा कॅमेरा पाहून तिने आधी चेहरा लपवायला सुरुवात केली आणि मग उलट पोलिसांवरच आरोप करायला सुरुवात केली.
 

पोलिसांनाही मारहाण केली
अंबाला पोलिसांचे डीएसपी राम कुमार यांनी सांगितले की, मुलींवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. दोन्ही मुली दारूच्या नशेत असल्याचे समजत आहे. मुलीच्या कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलींनी पोलिसांवरही हल्ला केल्याचे डीएसपीने मान्य केले. आता पोलिसांनी दोघांवर कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Car blown up, police uniform torn; Range Rover Girl's high voltage drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.