वाहनचोरांची होतेय मजा; मुंबईकर भोगताहेत सजा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 05:37 AM2022-12-12T05:37:24+5:302022-12-12T05:37:38+5:30

दहा महिन्याला अडीच हजार वाहने चोरीला

Car thieves are having fun; Mumbaikars are being punished | वाहनचोरांची होतेय मजा; मुंबईकर भोगताहेत सजा

वाहनचोरांची होतेय मजा; मुंबईकर भोगताहेत सजा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  
मुंबई : वाहन चोरांमुळे मुंबईकरांची डोकेदुखी कायम असल्याचे चित्र मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहेत.  जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत मुंबईतून दाेन हजार ५९८ वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिस दफ्तरी करण्यात आली आहे. तर अन्य चोरीचे १३,६८१ गुन्हे दाखल आहेत. यापैकी अवघे १,२९३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांना पोलिसांनी वेसण घातली असली तरी मोटार वाहन चोरी, जबरी चोऱ्या, दिवसा- रात्रीच्या घरफोड्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे दिसत आहे.

त्यातही वाहन चोरीच्या गुन्ह्यात एकाच चावीने दार उघडता येईल आणि इंजिनही सुरू होईल (सिंगल की सिस्टीम) अशा कार चोरांसाठी सहज लक्ष्य ठरतात. हे ओळखून वाहननिर्मिती कंपन्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. डिजिटल की, बोटाचा ठसा ओळखून प्रतिसाद देणारी यंत्रणा बसविली.  यातल्या बहुतांश उपाययोजनांचे संरक्षक कडे भेदून वाहन चोऱ्या होत आहेत.

...तर बनावट चावीने कार चोरणे अशक्य
१ फॉर्च्युनर कारला डिजिटल ‘की’ आहे. चावी आणि इंजिन एका बार कोडने बांधलेले असतात. त्यामुळे बनावट चावी तयार करून कार चोरणे निव्वळ अशक्य असते. 
२ अशा परिस्थितीत बार कोड ओळखून इंजिन सुरू करणाऱ्या ईसीएम यंत्रावरच चोरांच्या टोळ्या हल्ला करतात. हे यंत्र काढतात. स्वत:कडील ईसीएम यंत्र बसवून वाहन चोरतात. 
३ एखाद्या वाहनाचा बार कोड काय हे लांबून ओळखू शकेल, अशी परदेशी उपकरणे (ऑटो की प्रोग्रामर) चोरांच्या टोळीकडे आहेत. त्यामुळे ते दोन मिनिटांत अद्ययावत यंत्रणा मोडून अशा महागड्या कार चोरू शकतात.  

असा होतो व्यवहार....
n वापरलेल्या पण सुस्थितीतील वाहनांना मागणी आहे. अशा वाहनांची मागणी आली की ती विक्रेत्यांकडून चोरांपर्यंत येते. 
n ठराविक रंग, साल आणि मॉडेल कुठे मिळेल याचा शोध घेणारे, तिथल्या तिथे चावी बनवणारे, त्याआधारे गाडी चोरणारे, ती सुरक्षित ठिकाणी दोन दिवस दडवून ठेवणारे आणि त्यानंतर मजल- दरमजल करत विक्रेत्यापर्यंत पोहोचवणारे वेगळे अशा साखळीत वाहनचोरी होते. 
n कार पाच लाखांची असो वा ५० लाखांची चोराला २५ ते ३० हजार रुपयांत मिळते, अशीही माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Car thieves are having fun; Mumbaikars are being punished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी