काेराेनामुळे बाल तस्करीत वाढ, १६०० बालकांची सुटका, प्रलाेभनाने कुटुंबीयांची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 05:07 AM2020-12-07T05:07:46+5:302020-12-07T05:08:49+5:30
child trafficking News : कर्जमुक्तीचे आश्वासन आणि जास्त माेबदल्याचे प्रलाेभन दाखवून लहान मुलांना काम करण्यासाठी नेण्यात येईल, हादेखील धाेका हाेता.
नवी दिल्ली: काेराेना महामारीच्या संकटामध्ये बाल तस्करीमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या आठ महिन्यांमध्ये १६०० हून अधिक बालकांची सुटका केल्याची माहिती ‘बचपन बचाओ आंदाेलन’ या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.
नाेबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांची ही संस्था आहे. काेराेनामुळे अनेक कुटुंबांचा राेजगार गेला. त्यामुळे बाल तस्करीमध्ये वाढ झाल्याचे संस्थेने म्हटले आहे. संस्थेने देशभरातून १६७५ मुलांची सुटका केली आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक धनंजय टिंगल यांनी सांगितले की, आर्थिक संकटामुळे कुटुंबांकडून गैरमार्गाने कर्ज घेण्याचे प्रकार वाढण्याची भीती हाेती. साेबतच कर्जमुक्तीचे आश्वासन आणि जास्त माेबदल्याचे प्रलाेभन दाखवून लहान मुलांना काम करण्यासाठी नेण्यात येईल, हादेखील धाेका हाेता.
कुटुंबीयांच्या कर्जाचे ओझे चिमुकल्यांवर
कुटुंबीयांचे कर्ज फेडण्यासाठी या चिमुकल्यांना देशभर फिरावे लागले आहे. त्यांच्याकडून १२ तासांपेक्षा जास्त काम करुन घेण्यात आलेच, शिवाय माेबदलाही कमी देण्यात येत हाेता. तसेच खाण्यापिण्याचेही हाल हाेत हाेते.