चिखलीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 04:18 PM2019-03-13T16:18:07+5:302019-03-13T16:19:28+5:30
आरोपींच्या छळाला कंटाळून फिर्यादी महिलेच्या ६४ वर्षीय बहिणीने ढेकूण मारण्याचे औषध प्राशन केले.
पिंपरी : ढेकूण मारण्याचे औषध महिलेने प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखलीपोलिसांत एका महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आप्पा शिंदे, उध्दव शेळके (चिकू), मंगेवरू सुक्रे (मंगू), बबिता/गिता प्रवीण बराटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखलीतील कृष्णानगर येथील एका ५४ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची ६४ वर्षीय बहीण यांना आरोपी त्रास देत होते.आम्हास नोकरी लावतो असे सांगून, तुमच्या मुलाने आमच्याकडून घेतलेले पैसे परत दिले नाहीत. नोकरी लावून दिली नाही तर तुम्हाला बघून घेतो, असे आरोपींनी फिर्यादी महिला आणि त्यांच्या बहिणीस जगणे असहाय करून त्रास दिला. या छळाला कंटाळून फिर्यादी महिलेच्या ६४ वर्षीय बहिणीने ढेकूण मारण्याचे औषध प्राशन केले. यात त्यांचा मृत्यू झाला. संबंधित महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.