संदीप नाहरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी अन् सासूविरोधात गुन्हा
By पूनम अपराज | Published: February 18, 2021 09:18 PM2021-02-18T21:18:25+5:302021-02-18T21:20:47+5:30
Sandeep Nahar Suicide : कार्पेन्टरने दार तोडले. त्याच्या पत्नीसह अन्य दोन जणांनी संदीपला पंख्याला लटकलेला असताना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले.
बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०६ अन्वये संदीपची पत्नी कंचन आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत संदीपच्या वडिलांच्या केलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कंचन शर्मा संदीप नहारचा मृतदेह घेऊन दोन रुग्णालयात फिरत राहिली. संदीपला रुग्णालयात मृत घोषित झाल्यानंतर कांचनने पोलिसांना कळविल्याशिवाय मृतदेह आपल्यासोबत घरी नेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने खोलीच्या दरवाजाला गळफास लावून आत्महत्या केली. हे जेव्हा त्याची पत्नी कंचन यांना समजले तेव्हा त्यांनी कार्पेन्टर यांना दरवाजा तोडण्यासाठी सांगितला. कार्पेन्टरने दार तोडले. त्याच्या पत्नीसह अन्य दोन जणांनी संदीपला पंख्याला लटकलेला असताना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले.
Goregaon police register a case under Sec 306 (abetment to suicide) against the wife & mother-in-law of late actor Sandeep Nahar. Matter is being investigated after late actor's father filed a complaint, say police
— ANI (@ANI) February 17, 2021
Actor Sandeep Nahar was found dead at his residence on Feb 15.
कार्पेन्टरचे स्टेटमेंट महत्वाचे असू शकते
तथापि, आत्महत्येच्या प्रकरणामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यास नकार देण्यात आला. यानंतर त्याला दुसर्या रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर कंचनने मृतदेह घरी नेला आणि त्यानंतर पोलिसांना त्याविषयी माहिती दिली असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. जेणेकरुन मृत्यूचे कारण कळू शकेल. या प्रकरणात कार्पेंटरने खोलीचा दरवाजा उघडण्याबाबत दिलेला जबाब महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आज पोलीस त्याचा जबाब नोंदवू शकतात.
मृत्यू होण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला
संदीपने आत्महत्या कशी केली हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. डीसीपी विशाल ठाकूर म्हणाले, "संदीपची पत्नी कंचन यांनी संदीपचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. तिने दोन व्यक्तींच्या मदतीने मृतदेह खाली आणला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल.
कोण होता संदीप नाहर?
नीरज पांडे दिग्दर्शित "धोनी: द अनटोल्ड स्टोरी" चित्रपटात सुशांतसिंह राजपूत याच्या मित्राची म्हणजेच परमजित सिंग अर्थात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. याच छोटू भैय्यानं धोनीला त्याची पहिली क्रिकेटची बॅट दिली होती. धोनीच्या आयुष्यावरील या चित्रपटातील भूमिकेनंतर संदीप नाहरने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका केली. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटात संदीप नाहरने भुट्टा सिंग नावाची सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. संदीप नाहरचा हाच शेवटचा चित्रपट ठरला आहे. संदीप नाहर हा मूळचा चंदीगढचा असून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला होता.