गर्दी जमवणं भोवलं! भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह १०० ते १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:13 PM2021-08-11T20:13:29+5:302021-08-11T20:14:37+5:30
Crime Case : पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी चाळीसगाव येथे बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता.
चाळीसगाव जि. जळगाव : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठीमोर्चा काढून गर्दी जमविल्याप्रकरणी चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह १०० ते १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी चाळीसगाव येथे बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. यात आमदार चव्हाण हे ही सहभागी झाले होते. यात फिजिकल डिस्टनसिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे तसेच जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण, बैलगाडी शर्यत संघटनेचे अध्यक्ष दीपक काशिनाथ गायकवाड, भावेश मुकुंद कोठावदे,उत्तम भिकन पाटील,सौरभ अशोक पाटील,सोनू रमेश गायकवाड, अहमदखान युसुफखान,गौतम दीपक सोनवणे,प्रविण मराठे,दिलीप नथ्थू अहिरे,नितीन भगवान जाधव,सोमनाथ निंबा राजपूत, संतोष गणपत आगोणे, दीपक गांगुर्डे यांच्यासह १०० ते १२५ आंदोलकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश पाटील करीत आहेत.