माहेरहून २० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक देणार्‍या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 08:08 PM2020-06-20T20:08:00+5:302020-06-20T20:09:01+5:30

पती फैजल याने फिर्यादींना विविध कारणावरुन शिवीगाळ करुन मानसिक व शारीरिक छळ केला.

Case filed against 5 persons including husband who gave oral tripple talaq wife | माहेरहून २० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक देणार्‍या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

माहेरहून २० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक देणार्‍या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुणे : माहेरहून २० लाख रुपये न आणल्यामुळे मारहाण करुन पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीसह ५ जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती फैजल नजिब शेख, निलोफर नजिब शेख, सोहेल नजीव शेख (तिघेही रा. नाशिक), आरिफ खान, शबनम खान (रा़. मुंबई)  अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एनआयबीएम रोडवर राहणार्‍या एका २५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे २ वर्षापूर्वी फैजल याच्याबरोबर विवाह झाला आहे. त्यानंतर तिचे सासर नाशिक येथे आहे. पती व तिच्या सासरच्या लोकांनी फिर्यादींना विविध कारणावरुन त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून २० लाख रुपये आणण्यास सांगून ते न आणल्याने फिर्यादी यांना फैजल याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली व तोंडी तलाक देऊन मानसिक व शारीरिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Case filed against 5 persons including husband who gave oral tripple talaq wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.