गटारात रसायन सोडणारा टँकर चालक, मालक, कारखानदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 06:48 PM2021-01-17T18:48:26+5:302021-01-17T18:48:26+5:30

Crime News : महापालिका उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Case filed against tanker driver, owner, manufacturer for releasing chemicals in sewers | गटारात रसायन सोडणारा टँकर चालक, मालक, कारखानदारावर गुन्हा दाखल

गटारात रसायन सोडणारा टँकर चालक, मालक, कारखानदारावर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देअखेर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार टँकर चालक, मालक व ज्या कंपनीतून घातक रसायन आणले.

सदानंद नाईक


उल्हासनगर : संच्युरी रेयॉन कंपनीच्या सी साईज कंपनीच्या प्रवेशद्वार समोरील नाल्यात घातक रसायन सोडणाऱ्या टँकरला कंपनी सुरक्षा रक्षकांनी पकडला. टँकर चालक पळून जाण्यात यशस्वी झाला असून महापालिका उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारी वरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 उल्हासनगर संच्युरी रेयॉन कंपनीच्या सी साईज प्रवेशद्वार समोर एक टँकर दोन दिवसांपूर्वी उभा होता. टँकर व शेजारील गटारातून दुर्गंधी येत असल्याने, कंपनी सुरक्षरक्षकांनी चौकशी केली. तेंव्हा टँकरचा चालक पळून जाण्याचा यशस्वी झाला. टँकर व गटारातून दुर्गंधी येत असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला दिली. कंपनीने उल्हासनगर पोलीस ठाण्याला माहिती देऊन टँकर ताब्यात घेण्याचे सांगितले. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने, स्थानिक नागरिकांत असंतोष निर्माण झाला. अखेर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर रहेजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार टँकर चालक, मालक व ज्या कंपनीतून घातक रसायन आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात व अन्य गटारीत घातक रसायन सोडल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या आठवड्यात कैलास कॉलनी, भरतनगर परिसरात नदी पात्रातील उग्र दर्पमुळे शेकडो नागरिकांना डोळे चुरचुरने, डोके दुखी, दम, श्वास लागणे आदी त्रास झाल्याने, नागरिक रस्त्यावर आली. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर, प्रदूषण मंडळ अधिकारी, महापालिका अधिकारी व पोलिसांनी दोन रात्री जागून काढून नदी किनारी वॉच ठेवला. मात्र हाती काहीच लागले नाही. स्थानिक नागरिकांसह नगरसेवकांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली होती. प्रदूषण मंडळांनी आनंदनगर एमआयडीसी मधील एका कंपनीला नोटीस पाठविले असून नदीचे पाणी अद्यापही रंगहीन आहे. दर पाच मिनिटांनी नदीचे पाणी रंग बदलत असल्याने नदी किनारील कंपनीच्या चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.


नदीत रसायन सोडणारे रॅकेट

शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात वर्षानुवर्षे इतर ठिकाणाहून टँकरने आणलेले घातक व विषारी रसायन टाकले जाते. रसायन टाकताच किनारील परिसरात उग्र दर्पमुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊन, डोके दुखी, डोळे चुरचुरने, उलट्या आदी त्रास होतो. नदी पात्रात टँकरने इतर ठिकाणाहून आणलेले रसायन टाकण्यात येत असून त्यांचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे.
 

Web Title: Case filed against tanker driver, owner, manufacturer for releasing chemicals in sewers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.