लैंगिक छळ केल्याप्रकरणी गणेश आचार्यविरोधात अखेर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 10:19 PM2020-02-05T22:19:52+5:302020-02-05T22:22:07+5:30
गणेश आचार्यसह दोन महिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंबई - ३३ वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलीस ठाण्यात अलीकडेच तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लैंगिक छळ केल्याप्रकरणी आज अंबोली पोलीस ठाण्यात कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासह दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ (अ), ३५४ (ड), ५०९, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश आचार्य यांनी 'त्या' महिलेविरोधात केली पोलीस ठाण्यात तक्रार
गणेश आचार्यनं फेटाळले महिला कोरिओग्राफरचे आरोप, म्हणाला - या सगळ्यात सरोज खानचा हात
मुंबई - नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह दोन सहाय्यक नृत्य दिग्दर्शक महिलांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल, अंबोली पोलिसांकडून तपास सुरु https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) February 5, 2020
गणेश आचार्य विरोधात नृत्यदिग्दर्शिकेची तक्रार; अश्लील व्हिडिओ बघण्यास बळजबरी केल्याचा आरोप
गणेश आचार्यसह दोन महिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन महिलांनी २६ जानेवारी रोजी फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात पीडितेला मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे. तसेच, गणेश आचार्य याने बळजबरीने पॉर्न व्हिडीओ दाखवला असा आरोप केला होता.इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचे महासचिव असलेल्या गणेश आचार्यवर संबंधित महिलेने अनेक आरोप केले. पीडितेच्या तक्रारीनुसार, गणेश आचार्य इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचा महासचिव बनल्यापासून तिचा मानसिक छळ करत होता. तिने विरोध केल्यावर गणेशने तिचे सदस्यत्व रद्द केले, ज्यामुळे तिचे उत्पन्न बंद झाले. मात्र, नुकतीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गणेश आचार्य यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.