श्वानाला जीवे मारल्याप्रकरणी गुन्हा, प्राणीमित्राने घेतली पोलीस ठाण्यात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:20 PM2022-01-10T20:20:46+5:302022-01-10T20:21:49+5:30

Crime News : पोलिसांनी हरित देवनानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.

In the case of killing a dog, animal lover ran to the police station | श्वानाला जीवे मारल्याप्रकरणी गुन्हा, प्राणीमित्राने घेतली पोलीस ठाण्यात धाव

श्वानाला जीवे मारल्याप्रकरणी गुन्हा, प्राणीमित्राने घेतली पोलीस ठाण्यात धाव

googlenewsNext

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-४ नागराणी मंदिर परिसरात रविवारी दुपारी हरित देवनानी यांनी श्वानाला जीवे ठार मारल्याचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. प्राणीमित्र हरित देवनानी सृष्टी चुग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-४ श्रीराम परिसरात सृष्टी चुग राहत असून त्या प्राणीमित्र आहेत. रविवारी दुपारी एका कुत्र्याला निर्दयपणे जिवे ठार मारल्याचा प्रकार माहीत पडल्यावर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. श्वानाला जिवे ठार मारल्याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी हरित देवनानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In the case of killing a dog, animal lover ran to the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.