भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 07:57 PM2020-09-18T19:57:39+5:302020-09-18T19:58:11+5:30
पीडिता ही ३३ वर्षांची असून ती २०१२ मध्ये मुनावर याच्या अंधेरी येथील मायक्रॉन सिनेव्हिजनमध्ये नोकरीला लागली.
मीरारोड - भारतीय जनता पार्टीचा मीरारोडमधील स्थानिक नेता सय्यद मुनावर हुसेन याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता ही ३३ वर्षांची असून ती २०१२ मध्ये मुनावर याच्या अंधेरी येथील मायक्रॉन सिनेव्हिजनमध्ये नोकरीला लागली. नंतर त्याच्या मीरारोड येथील मायक्रॉन कन्स्ट्रक्शन कंपनीत ती काम करू लागली. तेथे दोघांचे प्रेमसंबंध जुळले व मुनावरने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी कधी लॉजमध्ये तर कधी घरी शारीरिक संबंध ठेवले .
या दोघांच्या संबंधाची माहिती त्याच्या पत्नीला मिळाल्या नंतर दोघां मध्ये भांडण झाले . नंतर फिर्यादीने नोकरी सोडली. त्या नंतर देखील मुनावर याने तुझ्याशी लग्न करेन असे आश्वासन देत तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या दोघांमध्ये नवरा-बायकोसारखे नाते असल्याने ७ ऑगस्ट रोजी पीडिता मुनावरकडे खर्चासाठी पैसे मागायला गेली असता त्याने तिला मारहाण केली . त्या प्रकरणी तिने पोलिसात फिर्याद दिली होती. पीडितेला समजले कि मुनावर याने दुसरे लग्न पण केले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिलेल्या फिर्यादी वरून गुरुवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी मुनावर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपाचे तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांनी मुनावर याला मोठ्या गाजावाजात भाजपात प्रवेश दिला होता . तर मुनावर हा महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांचा भाऊ असला तरी त्याला खूप वर्षां पूर्वीच कुटुंबातून बेदखल केले गेले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार