उल्हासनगरात मटका जुगार अड्ड्यावर धाड १९ जणांवर गुन्हे दाखल
By सदानंद नाईक | Published: April 28, 2023 06:15 PM2023-04-28T18:15:13+5:302023-04-28T18:15:34+5:30
मटका जुगार, गावठी दारू अड्डे, ऑनलाईन लॉटरी जुगार शहरात जोरात सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर व मध्यवर्ती पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी आडोशाला चालणाऱ्या तीन मटका जुगार अड्ड्यावर गुरवारी धाडी टाकून तब्बल १९ जणांवर गुन्हे दाखल केले. मटका जुगार, गावठी दारू अड्डे, ऑनलाईन लॉटरी जुगार शहरात जोरात सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१, फक्कड मंडली चौक येथील मोकळ्या जागेवरील मटका जुगार अड्ड्यावर उल्हासनगर पोलिसांनी गुरवारी सायंकाळी ५ वाजता धाड टाकून भावेश होतचंदानी, अजय देशमुख, विनायक खरात, अशोक खत्री, सलीम हुसेन शेख, गोकुळ तुकाराम बागुल, जीवन विठ्ठल डोंगरदिवे, हरेश गंभीर कुचे, सुनील दशरथ शिंदे, दीपक लालवानी, हरेश कुतुमल कुकरेजा, पांडुरंग शंकर पवार अश्या तब्बल १२ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले. तसेच ७ हजार २३० रुपयांची रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. तर दुसऱ्या घटनेत मध्यवर्ती पोलिसांनी गुरवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता मिटठू धाब्या जवळील मटका अड्ड्यावर धड टाकून सागर आप्पा पवार, रविकांत नवनाथ साळवे राजेश खटवानी असे तिघांना रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह अटक करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तर तिसऱ्या घटनेत मध्यवर्ती पोलिसांनी कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर गुरवारी रात्री सव्वा ११ वाजता धाड टाकून मटका जुगार खेळणारे नागेश चंद्रमोहन त्रिमल, प्रदीप प्रल्हाद गायकवाड, भीमराव गौतम साळवे व संदीप एकनाथ जाधव यांना अटक करुन त्यांच्याकडून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. उल्हासनगर व मध्यवर्ती पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असताना इतर अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याची ओरड नागरिकांची आहे.