कोरोना रुग्णांच्या भेटी घेतल्याने माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:08 PM2020-07-20T15:08:58+5:302020-07-20T15:09:53+5:30
सोशल मेडीयावर भेटीचे फोटो सामाजिक करत कोरोना संसर्ग पसरवल्या प्रकरणी माजी नगरसेवक चांद हुमायु मनियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी ( जि. अहमदनगर) : येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना भेटून सोशल मेडीयावर भेटीचे फोटो सामाजिक करत कोरोना संसर्ग पसरवल्याप्रकरणी माजी नगरसेवक चांद हुमायु मनियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी शहरासह तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना बाधित रुग्ण संखेत भरमसाठ वाढ होत असल्याने प्रशासनाने शहरातील आजाद चौक तसेच खाटिक गल्ली परिसर सील केला असून परिसरातील नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशाचे तसेच कोविड-१९ च्या नियमांचे पालन न करता माजी नगरसेवक चांद हुमायु मनियार यांनी काल रविवारी प्रतिबंधित क्षेत्र ओलांडून उपजिल्हा रुग्णालयातील पोलीस बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भेट घेवून सोशल मेडीयावर फोटो व्हायरल केले व कोरोना रोगाचा संसर्ग पसरवण्यास मदत केल्या प्रकरणी चांद मनियार यांच्या विरोधात सोशल डिस्टन्स न पाळणे,कोरोना रोगाच्या प्रसाराबाबत खबरदारी न घेणे,कोरोना उपाययोजना २०२० चे अधिनियम ११, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'