आंघोळ करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ काढून धमकावले; विनयभंग, पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Published: April 4, 2024 03:59 PM2024-04-04T15:59:10+5:302024-04-04T16:01:32+5:30
वरूड पोलिसांनी 22 वर्षीय राजकुमार अरुण तुमडाम विरूद्ध केला गुन्हा दाखल
अमरावती : एका अल्पवयीन मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. वरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला. तत्पूर्वी, तिचा पाठलागदेखील करण्यात आला होता. २१ मे २०२३ ते १ एप्रिल २०२४ दरम्यान ती छळमालिका सुरू होती. याप्रकरणी वरूड पोलिसांनी ३ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपी राजकुमार अरुण तुमडाम (२२, रा. टेंभूरखेडा) याच्याविरूद्ध विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, गेल्या वर्षभरापासून आरोपी राजकुमारने पीडित अल्पवयीन मुलीचा पाठलाग चालविला होता. तो तिला जबरदस्तीने भेटण्याचा प्रयत्नदेखील करायचा. यादरम्यान १ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास आरोपी पीडित मुलीच्या घरात शिरला. तिचा विनयभंग केला. तत्पूर्वी, त्याने ती आंघोळ करतानाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट केला. तो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी तिला दिली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. अखेर तिने घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांच्या कानावर घातला. त्यांनी धीर देत तिचे सांत्वन केले तथा पोलिस ठाणे गाठले. वरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.