दुहेरी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल; पाच आरोपींना अटक, तिघे फरार

By अनिल गवई | Published: July 2, 2023 02:10 PM2023-07-02T14:10:25+5:302023-07-02T14:11:02+5:30

याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Case registered for double murder; Five accused arrested, three absconding | दुहेरी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल; पाच आरोपींना अटक, तिघे फरार

दुहेरी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल; पाच आरोपींना अटक, तिघे फरार

googlenewsNext

खामगाव : शेतीच्या वादातून चिंचपूर येथे शनिवारी झालेल्या दुहेरी हत्येप्रकरणी हिवरखेड पोलीसांनी सात आरोपींविरोधात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

याप्रकरणी शेख जावेद खान अल्यारखाँ रा. चिंचपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नातेवाईक असलेल्या सात जणांनी मोहम्मद खाँ तुराबखा, शेख कासम शेख जान मोहम्मद, शरीफाबी तुराबखा, शकीलाबी अल्यारखाँ यांच्या अंगावर मिरची पावडर फेकून लाठ्या काठ्यांनी, चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. तर, मोहम्मद खाँ तुराबखा, शेख कासम शेख जान मोहम्मद यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जिवाने ठार मारल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी सात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, उर्वरित तीन आरोपींचा हिवरखेड पोलिस शोध घेण्यात येत आहे.

आधी टाकली मिरची पावडर, नंतर केला हल्ला
शेतीचा बळजबरीने ताबा घेण्यासाठी आरोपींनी नातेवाईक असलेल्या चौघांच्या डोळ्यावर आधी मिरची पूड फेकली. त्यानंतर शस्त्राने सपासप वार केले. त्यामुळेच घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा
से. मुक्तार से.सैद्, से. मुश्ताक से. मुक्तार, से. सलमान से. मुक्तार, से.राजु से. रज्जाक सर्व रा. चिचपूर, कलीमखाँ सत्तारखाँ, रशीद खाँ सत्तारखॉ, बशीरखाँ सत्तारखॉ रा. मेहकर अशा सात जणांवर भादंवि कलम ३०२, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १२०ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Case registered for double murder; Five accused arrested, three absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.