हिंजवडीत प्रवाशाची लूट ; ६० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 07:51 PM2018-10-22T19:51:03+5:302018-10-22T19:55:15+5:30

मुंबई-बंगळूरू महामार्गावरून फिर्यादी मोहिते हे खासगी प्रवासी वाहनाने सांगलीकडे जात होते.

cash and jewellery of sixty thousands theft at hinjawadi | हिंजवडीत प्रवाशाची लूट ; ६० हजारांचा ऐवज लंपास

हिंजवडीत प्रवाशाची लूट ; ६० हजारांचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्देदोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : सांगलीतील खानापूर गावी जात असताना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगेजवळ आरोपींनी फिर्यादीला धमकावुन त्यांच्याकडील दागिने आणि रोख रक्कम २० हजार रुपये असा एकुण ६० हजारांचा ऐवज पळवुन नेला. याप्रकरणी रणवीर राजेंद्र मोहिते (रा.अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ गोविंद सोळंके (वय २९,रा. थेरगाव), संतोष अशोक खामकर (वय २२, रा. पांडवनगर, हिंजवडी) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मोहिते हे मुंबई बंगळूरू महामार्गावरून खासगी प्रवासी वाहनाने सांगलीकडे जात होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास हिंजवडी हद्दीत मोटार चालक व त्याचा एक साथीदार यांनी धक्काबुक्की करून फिर्यादीकडील दागिने व रोकड जबरदस्तीने हिसकावुन घेतली. मोहिते यांना मोटारीतून खाली उतरविले.पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जी. जे. धामणे  या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: cash and jewellery of sixty thousands theft at hinjawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.