आत्याची हत्या करून लुटली 1 कोटी पेक्षा जास्त कॅश आणि दागिने, प्रेयसीसोबत परदेशात होणार होता शिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:08 PM2022-12-17T14:08:24+5:302022-12-17T14:09:06+5:30
Crime News : 13 डिसेंबरला महिलेची हत्या करण्यात आली होती. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर त्यांना दिसलं की, दागिने आणि कॅशही चोरी करण्यात आली आहे.
Crime News : दिल्ली पोलीस क्राइम ब्रांचने दिल्लीच्या शालीमार बाग भागात झालेल्या 56 वर्षीय महिलेच्या हत्येची केस सॉल्व केली आहे. या हत्येप्रकरणी महिलेचा भाचा आणि त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. 13 डिसेंबरला महिलेची हत्या करण्यात आली होती. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर त्यांना दिसलं की, दागिने आणि कॅशही चोरी करण्यात आली आहे.
केसची गंभीरता बघता पोलिसांसोबत क्राइम ब्रांचची टिमही केसचा तपास करत होती. क्राइम ब्रांचने या प्रकरणी महिलेचा भाचा मधुर आणि त्याची महिला मैत्रीण अमरजीत कौर हिलाही अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून घरातून चोरी झालेले 1 कोटी रूपयांचे दागिने आणि 14 लाख रूपये कॅशही ताब्यात घेतली आहे.
13 डिसेंबरला 56 वर्षीय रजनी मदानचा मुलगा कामावर गेला होता. मुलगा चेतन कामावर गेल्यावर महिला घरात एकटीच राहत होती आणि रोज चेतन सकाळी आणि दुपारी फोन करून आईची विचारपूस करत होता. 13 तारखेला त्याने दुपारी 3 वाजता आईला फोन केला तर आईने काहीच उत्तर दिलं नाही. तिचा फोन स्वीच ऑफ लागत होता.
चेतन रात्री कामाहून घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की, घराचं मेन गेट उघडं आहे. त्याने लगेच पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आतील दार तोडलं. आत जे दिसलं ते पाहून सगळेच हैराण झाले. सगळं साहित्य फेकाफेक केलेलं होतं. तर महिलेचा मृतदेह बेडवर पडला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. नंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही बघण्यात आले.
कॅमेरात एक संशयित व्यक्ती घरात शिरताना दिसली. क्राइम ब्रांचची टीम या केसचा तपास करत होती. त्यांनी अमृतसरच्या एका हॉटेलमध्ये रेड टाकत 31 वर्षीय मधुर कुंद्रा आणि त्याची 28 वर्षीय प्रेयसी अमरजीत कौर संधूला अटक केली. आरोपीने चौकशी दरम्यान सांगितलं की, तो मृत महिलेचा भाचा आहे आणि त्याचं लग्नही झालं आहे. त्याला एक 7 वर्षांचा मुलगा आहे. आरोपीने मेरठ येथून एमबीए केलं आहे आणि सध्या तो मेडिकल प्रोडक्टचा सप्लाय करतो. त्यासाठी तो अनेक हॉस्पिटल्समध्ये जातो.
आरोपी अमरजोत कौर सिंधू अमृतसरच्या एका हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तिचं 2021 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर तिचा पती दुबईला गेला होता. यादरम्यानच मधुर आणि अमरजोत संपर्कात आले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण मार्च 2022 मध्ये अमरजोतचा पती दुबईहून परत आला तेव्हा तिचं पतीसोबत भांडण झालं. त्यानंतर तो पुन्हा दुबईला गेला. त्यानंतर अमरजोत अमृतसरमध्ये पीजी म्हणून राहत होती. पोलिसांनुसार, मधुर आणि अमरजोत लग्न करून परदेशात शिफ्ट होणार होते. त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती.
27 नोव्हेंबरला मृत महिलेचा मुलगा अमृतसरला गेला होता आणि त्याची तिथे मधुरसोबत भेट झाली. दोघांमध्ये बोलणं झालं तेव्हा मधुरला समजलं की, चेतनच्या आईकडे खूप पैसे आहेत आणि दागिने आहेत. त्यानंतर मधुरने चेतनच्या बॅगेतून घराच्या चाव्या चोरी केल्या. नंतर 13 डिसेंबरला तो चेतनच्या घरी आला आणि तोंड दाबून रजनी मदानची हत्या केली. त्यानंतर 1 कोटी रूपयांचे दागिने आणि 14 लाख रूपयांची कॅश घेऊन फरार झाले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.