लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेचार लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 09:01 PM2019-04-03T21:01:42+5:302019-04-03T21:02:26+5:30
रक्कम शांती नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली.
Next
ठाणे - भिवंडी येथे आचार संहिता पथक प्रमुख भाऊ भोईर यांनी कारवाई करून ४ लाख ५० हजार रुपयांची रोकड पकडली असून ती शांतीनगर पोलीस ठाण्यात रिपोर्ट करून जमा केली आहे. साईबाबा नाका, कल्याण भिवंडी बायपास रोड येथे मारुती स्विफ्ट डिझायर एमएच - 48; ए - ७८८५ या वाहनाची तपासणी केली असता ही रोकड मिळून आली. याबाबत वाहन चालक अजीज मोहम्मद वजीर खान याला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने व रकमेबाबत पुरावा न दिल्याने रक्कम शांती नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली.