एटीएममध्ये रोकड अडकली; तरुणानं नजर चुकवून चोरली, आता नोंदवला गेला गुन्हा
By दिपक दुपारगुडे | Published: March 13, 2024 08:14 PM2024-03-13T20:14:34+5:302024-03-13T20:14:44+5:30
अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा
दीपक दुपारगुडे, सोलापूर: एटीएम सेंटरमध्ये बचत खात्यावर २७ हजरा ५०० रुपये रोख रक्कम भरणा करताना मशिनमध्ये अडकली. २५ ते ३० वयोगटातील तरुणानं ती नजर चुकवून चोरुन नेल्याची घटना डफरीन चौकातील एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. या प्रकरणी करुणा महेश काशीद (वय- ४२, रा. राणाप्रतापनगर, सोलापूर) यांनी फिर्याद नोंदली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी या त्यांच्या मैत्रिणीसोबत ३ मार्च २०२४ रोजी रात्री दहाच्या सुमारास डफरीन चौक येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये बचत खात्यावर २७ हजार ५०० रुपये डिपॉझिट करण्यासाठी आल्या होत्या. पैसे भरताना रक्क़म मशिनमध्ये अडकली. या दरम्यान २५ ते ३० वयोगटातील तरुण एटीएमसेंटरमध्ये आला. त्याने फिर्यादीच्या नकळत अडकलेली रक्क़म चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.