ATM फोडून रोकड पळविली; पिकअप चिखलात अडकल्याने चोरी उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:38 PM2023-10-03T12:38:14+5:302023-10-03T12:40:18+5:30
या घटनेची माहिती मिळताच माढा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
अमर गायकवाड
माढा : अहमदनगर जिल्ह्य़ातील रशीन येथील दोशी पेट्रोल पंपा जवळील हिताची कंपनीचे एटीएम फोडून पैशाची चोरी केली. दरम्यान, एटीएम मशीन पिकअपमधून घेऊन जाताना चिखलात पिकअप अडकल्याने चोरीची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अहमदनगर येथील एटीएम फोडून माढा तालुक्यातील लोंढेवाडीजवळ आणून गॅस कटरच्या सहाय्याने फोडून एटीएममधील रक्कम लंपास केली. मात्र चिखलात पिकअप अडकल्याने चोरट्यांनी पिकअप जागेवर सोडून तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच माढा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, घटना गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हेही घटनास्थळावर दाखल झाले असून चोरट्यांच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली आहेत. या घटनेत संशयित चौघांना पेालिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून चोरटे हे सोलापूर जिल्ह्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.