अबब! दिल्लीत IGT एअरपोर्टवर सापडली कोट्यवधीची रोकड; IT अधिकारी मोजून मोजून दमले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:24 PM2023-01-23T13:24:13+5:302023-01-23T13:24:32+5:30
घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली. नोटांबाबत आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर चेकिंगवेळी CISF नं एका व्यक्तीला तब्बल ३.७ कोटीची रोकड घेऊन जाताना ताब्यात घेतले. रोकड एअरपोर्टच्या कार्गो टर्मिनलहून जप्त केली. आरोपीनं पैसे एका पेटीत भरले होते. सुरुवातीच्या तपासानंतर हे प्रकरण आयटी विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. IT टीम आता इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड कुठून आणली आणि कोणत्या कामासाठी त्याचा वापर केला जाणार होता याची चौकशी करत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर रविवारी एका कार्गो पॅकेजला स्कॅन करताना त्यात मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचं समोर आले. एअरपोर्टवरील सुरक्षा रक्षकांनी जेव्हा हे पॅकेज उघडले तेव्हा त्यांचे डोळे दिपले. पॅकेजमध्ये नोटांचे खूप सारे बंडल होते. मोठ्या प्रमाणात कॅश असलेली जप्त केली त्यानंतर त्याची मोजणी सुरू केली.
कॅश मोजल्यानंतर ती जप्त केलेली रोकड ३.७ कोटी रुपये असल्याचं सोमवारी कळवण्यात आले. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली. नोटांबाबत आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत. या नोटा दिल्लीहून केरळला नेल्या जात होत्या. दिल्लीतील एका कंपनीने केरळच्या कंपनीला ही कॅश पाठवली होती. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. या लोकांची सुरक्षा एजेंसी, स्पेशल सेल आणि दिल्ली पोलीस संयुक्तपणे चौकशी करत आहेत.
लाखोंचे दागिने जप्त
याआधी १४ जानेवारीला दिल्ली एअरपोर्ट आणि विजिलेंस टीमने संयुक्त ऑपरेशन करत विविध एअरलाइन्सच्या ८ लोडर पकडले होते. त्यांच्याकडून १५ लाखांचे दागिने, घड्याळ, आयपॅड इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींची चौकशी केली ते सर्व एअरपोर्टवर चोरी करायचे. तपासातून एअरपोर्टवर झालेल्या चोरीची प्रकरणांचा खुलासा झाला. या आरोपींनी चोरीसाठी एअरपोर्टवर गँग बनवल्याचं DCP रविकुमार सिंह यांनी माहिती दिली.