गुरांच्या मांसाची ऑटाेतून वाहतूक करणारा अटकेत, रिक्षाचालकाविरुद्धही गुन्हा
By सचिन राऊत | Published: July 8, 2023 06:23 PM2023-07-08T18:23:56+5:302023-07-08T18:24:24+5:30
या ऑटाेमधील मांस जप्त करण्यात आले असून, ऑटाे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकाेला : बार्शीटाकळी येथून अकाेल्यातील सिंधी कॅम्पकडे एका ऑटोमध्ये गुरांच्या मासाची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असल्याच्या माहितीवरून खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे व कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून ऑटाे पकडला. या ऑटाेमधील मांस जप्त करण्यात आले असून, ऑटाे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझाद काॅलनीतील रहिवासी लखानी ताैफीक माेहम्मद आसीफ वय २४ वर्षे हा एम एच एए ६७२६ क्रमांकाच्या ऑटाेमधून १०० किलाे मांस किंमत सुमारे ७० हजार रुपये व ऑटाे २५ हजार रुपये, असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ऑटाे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सायरे व डीबीचे कर्मचारी विजय चव्हाण, रविराज डाबेराव, आकाश राठोड, रोहित पवार यांनी केली.