HoneyTrap : हनी ट्रॅपमध्ये अडकला, हेरगिरीच्या आरोपाखाली हवाई दलाचा जवान देवेंद्रला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 01:10 PM2022-05-12T13:10:44+5:302022-05-12T13:23:16+5:30

Honeytrap :पोलिसांना आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद व्यवहारही आढळून आले आहेत.

Caught in Honeytrap, Air Force jawan Devendra arrested on spying charges | HoneyTrap : हनी ट्रॅपमध्ये अडकला, हेरगिरीच्या आरोपाखाली हवाई दलाचा जवान देवेंद्रला अटक

HoneyTrap : हनी ट्रॅपमध्ये अडकला, हेरगिरीच्या आरोपाखाली हवाई दलाचा जवान देवेंद्रला अटक

googlenewsNext

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. देवेंद्र शर्मा असे आरोपीचे नाव आहे. या संपूर्ण कामात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा (ISI) हात असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. भारतीय हवाई दलाचे पहिले जवान देवेंद्र शर्मा यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून भारतीय हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांना आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद व्यवहारही आढळून आले आहेत.

हा जवान कानपूरचा रहिवासी 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवेंद्र शर्मा कानपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचनुसार, आरोपीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शेतातून घरी परतणाऱ्या तरुणीवर 'गॅंगरेप', आरोपींनीही दिली 'ही' धमकी

जवानाकडून ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा यांच्याकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जात होता की, किती रडार कुठे तैनात आहेत? हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे व पत्ते गोळा करण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. या संदर्भात गुप्तचर यंत्रणेच्या इनपुटनंतर गुन्हे शाखेने आरोपी देवेंद्र शर्माला ६ मे रोजी अटक केली.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्माला धौला कुआन येथून अटक करण्यात आली आहे. देवेंद्र शर्मा हे कानपूरचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची एका महिलेशी मैत्री झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर महिलेने फोनवर अश्लील बोलून देवेंद्र शर्माला जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. ती महिला ज्या क्रमांकावरून देवेंद्र शर्मा यांच्याशी बोलायची तो क्रमांक भारतीय सेवा पुरवठादाराचा आहे.

 

Web Title: Caught in Honeytrap, Air Force jawan Devendra arrested on spying charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.