अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला; ५० लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:20 AM2021-03-26T00:20:48+5:302021-03-26T00:21:00+5:30

सावंतवाडी पोलिसांची बावळट येथे कारवाई

Caught a truck transporting illegal liquor; Property worth Rs 50 lakh confiscated | अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला; ५० लाखाचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला; ५० लाखाचा मुद्देमाल जप्त

Next

सावंतवाडी : गोव्याहून नशिकच्या दिशेने गोवा बनावटीची दारू अवैध रित्या घेउन जाणारा ट्रक सावंतवाडी पोलिसांंनी बावळट येथे पकडला ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली असून,याप्रकरणी ट्रकचालक रवींद्र रामकिशन (३० रा. दूरी जनपुर भिवाई, हरियाणा) याला अटक करण्यात आली.तर ट्रक मधून ३० लाख रूपयांची दारू व २० लाख रूपयांचा ट्रक असा ५० लाख रूपयांंचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.गेल्या दोन दिवसात बांदा व सावंतवाडी येथे करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाया आहेत.विशेष म्हणजे हा ट्रक चार दिवस म्हापसा येथे उभा करून ठेवण्यात आला होता तो आपण घेउन आलो असे चालक पोलिसांंना सांगत होता.

याबाबत माहीती अशी गोवा म्हापसा येथे एक ट्रक गेले चार दिवस उभा करून ठेवण्यात आला होता.तो ट्रक मालकांने आपला चालक रविंद्र राम किशन याला घेउन येण्यास सांगितला तो ट्रक जवळ गेला तेव्हा ट्रक जवळ कोण नव्हता.त्यांने ट्रक नाशिकच्या दिशेने घेउन जाण्यास निघाला असता.सावंतवाडी पोलिसांना अगोदरच दारू भरून ट्रक येणार अशी टिप असल्याने बांद्याहून दाणोलीला बाहेर पडणाºया रस्त्यावर बावळट जवळ पोलिसांंचे एक पथक थांबले होते.तीन च्या सुमारास हा ट्रक तेथे आला असता पोलिसांनी ट्रक थांबवला त्या वेळी ट्रक चालकांने भंगार असल्या चे सांगितले.मात्र पोलिसांनी ट्रकच्या आत मध्ये जाउन तपासणी केली असता ट्रक ला बाहेरून रिकामी बॅरेल लावली होती.तर आत मध्ये गोवा बनावटीचे दारू बॉक्स अवैध रित्या भरून ठेवले होते.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रक सह चालकांला ताब्यात घेतले यावेळी ट्रक मध्ये गोवा बनावटीच्या दारूचे मोठ्या प्रमाणात बॉक्स होते.यांची किमत साधरणता ३० लाख रूपये असल्याचे पोलिसांचे म्हणने आहेत.तर ट्रक २० लाख असा मिळून ५० लाख रूपये किमतीचा मुद्देमाल पोेलिसांनी जप्त केला आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक शशिकांत खोत,  पोलीस कर्मचारी महेश महेश जाधव, प्रसाद कदम, सतीश कविट कर,  दर्शन सावंत,दर्शन साटेलकर, भुषण भोवर, वाहतूक पोलीस प्रवीण सापळे, सुनील नाईक यांनी केली.

Web Title: Caught a truck transporting illegal liquor; Property worth Rs 50 lakh confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.