दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणारा CBIच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:54 PM2021-05-24T20:54:22+5:302021-05-24T20:57:36+5:30
CBI arrested : क्वार्टर भाड्याने दिल्या प्रकरणी तब्बल 1 लाख 82 हजार 604 रुपयांचा दंड या व्यक्तीला ठोठावण्यात आला.
दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या एका व्यक्तीला सीबीआयने सोमवारी अटक केली. सरकारी क्वार्टरमध्ये पोटभाडेकरू ठेवला म्हणून लावण्यात आलेली दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी या व्यक्तीने ३० हजारांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना या व्यक्तीला सीबीआयने रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार हा एक सरकारी कर्मचारी आहे. त्याला सरकारच्या वतीने मुंबईच्या घाटकोपर पश्चिममधील सीजीएस कॉलनी येथे २०१४ मध्ये राहण्यासाठी क्वार्टर मिळाले. मात्र, या सरकारी कर्मचाऱ्यानं त्या क्वार्टरमध्ये पोटभाडेकरू ठेवल्याचं समोर आले. ऑक्टोबर २०१९ मध्ये या सरकारी कर्मचाऱ्याने क्वार्टर दुसऱ्याला भाडे तत्वावर दिल्याचे उघडकीस आले. त्यांनंतर या सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. क्वार्टर भाड्याने दिल्या प्रकरणी तब्बल 1 लाख 82 हजार 604 रुपयांचा दंड या व्यक्तीला ठोठावण्यात आला.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाकडून दिल्लीतील ट्विटर इंडियाच्या कार्यालयात छापेमारी सुरु pic.twitter.com/xAQtS25Odz
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2021
ही दंडाची रक्कम कमी करण्यासाठी एका व्यक्तीने सरकारी कर्मचाऱ्याकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणाशी संबधित एका अधिकाऱ्याच्या मार्फत हे काम करून देण्याचं आश्वासन या आरोप व्यक्तीने दिले. दरम्यान, या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने सापळा रचत लाच घेणाऱ्या या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणात काम करून देणाऱ्या संबंधित सरकारी कर्मचाऱ्याचा सहभाग तपासला जात आहे.