नीट प्रकरणातील लातूरचा आराेपी गंगाधर याला सीबीआयकडून अटक
By राजकुमार जोंधळे | Published: June 29, 2024 05:15 AM2024-06-29T05:15:49+5:302024-06-29T05:16:11+5:30
आराेपी मुख्याध्यापक व शिक्षकाची चाैकशी सुरु असून, दाेघांनी दिलेल्या माहितीचे पाेलिस विश्लेषण करत आहेत.
लातूर - नीटमध्ये गुणवाढ करुन देण्याचे आमिष दाखवून पालकांना गंडविणाऱ्या लातुरातील साथीदारांशी दिल्लीतून जुळवाजुळव करणारा आराेपी गंगाधर सीबीआयच्या अटकेत असल्याचे सूत्रांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
लातूर, बीड व विविध भागातील पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे मिळविणारा आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण, शिक्षक संजय जाधव या दाेघांशी संपर्कात असलेला इरण्णा काेनगलवारचा शाेध सुरु आहे. पंरतु, इरण्णाशी संपर्कात असलेला दिल्लीतील आराेपी गंगाधरला सीबीआयने अटक केली आहे. आराेपी मुख्याध्यापक व शिक्षकाची चाैकशी सुरु असून, दाेघांनी दिलेल्या माहितीचे पाेलिस विश्लेषण करत आहेत.
सीबाआय करणार तपास...
देशभरातील नीट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग हाेत आहे. लातूर येथील नीट गुणवाढीसाठी ५० हजार अडव्हाॅन्स आणि ५ लाखांची बाेलणी करणाऱ्या आराेपींचीही चाैकशी सीबीआय करणार आहे. दरम्यान, लातूरच्या प्रकरणाचा तपास शनिवारपासूनच सीबीआय हाताळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.